शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काटाकाटीच्या राजकारणाचा उमेदवाराला फटका; बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादीला चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 19:36 IST

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काटाकाटीचे राजकारण जोरात

- सतीश जोशी 

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काटाकाटीचे राजकारण अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केले. या राजकारणाचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसणार आहे.केज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आ. संगीता ठोंबरे प्रचारात सक्रिय सहभागी असतानाही लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात डॉ. अंजली घाडगे यांची अनपेक्षित ‘एन्ट्री’ झाली. डॉ. घाडगे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून ठोंबरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाची मतेही घेतली होती. आता घाडगे ह्या भाजपा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार करीत आहेत. यामुळे आ. ठोंबरे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

बेरजेचे राजकारण करताना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला असला तरी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली नाराजी दूर करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेवराईत भाजपचे विद्यमान आ. लक्ष्मण पवार यांचे प्रभुत्व असताना देखील त्यांनी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांना झुकते माप दिले. परिणामत: लक्ष्मण पवार यांनी अनेकदा उघड-उघड नाराजी दाखविली. आता या दोघांनाही एकत्र आणताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली असली तरी दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे मोहन जगताप यांना प्रवेश देऊन तेथील भाजपाचे विद्यमान आ. आर.टी. देशमुख यांच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले. माजलगावमधून देशमुखांसह रमेश आडसकर हेही आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे बीडचे स्थानिक आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि आ.सुरेश धस यांना पक्षापासून दूर जावे लागले. क्षीरसागर बंधू युतीच्या वाटेवर असून, त्याचा फटका उमेदवार बजरंग सोनवणे यांना बसत आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक संदीप क्षीरसागर यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सेनेचे माजी आमदार सुनील धांडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे.

आष्टीतही संभ्रमआष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आ. भीमराव धोंडे आणि आ. सुरेश धस यांना पंकजा मुंडे यांनी एकत्र आणले असले तरी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीबाबत संभ्रमाचे वातावरण दोघांच्याही कार्यकर्त्यांत निर्माण झाले आहे. मध्यंतरी या दोघांनीही एकाच पक्षात असताना जाहीररीत्या आरोप-प्रत्यारोप केले होते. बीड लोकसभा मतदारसंघात दोन्हीही पक्षातील नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकaurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019beed-pcबीड