शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीड पोलिसांकडून १५ कार्यक्रमांतून एक कोटी ९ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:30 IST

बीड पोलिसांची कामगिरी : चोरी, दरोड्यातील रोख रकमेसह दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर, ट्रकचाही समावेश

बीड : चोरी, दरोड्यात चोरट्यांनी लंपास केलेला मुद्देमाल जप्त करून तो फिर्यादींना बीडपोलिसांकडून सन्मानपूर्वक परत केला जात आहे. आतापर्यंत १५ कार्यक्रमांमधून तब्बल १ कोटी ९ लाख ३६ हजार ६११ रूपयांचा मुद्देमाल संबंधितांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. यामध्ये रोख रकमेसह दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर आणि ट्रकचाही समावेश आहे. या कामगिरीमुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दीड वर्षांपासून अखंडित सुरू आहे.

मेहनत करून कमावलेला मुद्देमाल घेऊन चोरटे अवघ्या काही क्षणात पसार होतात. त्यानंतर खचलेल्या मनाने नागरिक पोलीस ठाण्यात जावून फिर्याद देतात. पोलिसांकडून याचा तपास करण्यासाठी धावपळ केली जाते. यात काही गुन्ह्यांचा तपास लागतो तर काही तसेच प्रलंबीत राहतात. मात्र ज्या गुन्ह्यांचा तपास लागला, त्यात चोरट्यांसह त्यांच्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधितांना परत मिळावा, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर हा मुद्देमाल परत देण्यासाठी एक सार्वजनिक मोठा कार्यक्रम घेण्याचा संकल्प जी.श्रीधर यांनी केला. त्याप्रमाणे  २५ सप्टेंबर २०१७ पासून कार्यक्रम घेण्यास सुरूवात झाली. आजही ते अखंडितपणे घेतले जातात. आतापर्यंत १५ कार्यक्रम घेण्यात आले असून यामध्ये तब्बल १ कोटी ९ लाख ३६ हजार ६११ रूपयांचा मुद्देमाल संबंधितांना सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे.

दरम्यान, मंगळवारीही कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ७ लाख १८ हजार २५० रूपयांचा किंमती मुद्देमाल परत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, दरोडा प्रतिबंधकचे सपोनि गजानन जाधव यांच्या हस्ते हा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आला. सुत्रसंचालन सपोनि दिलीप तेजनकर यांनी केले. पोह राम यादव, गणेश हंगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी पोलीस अधीकारी, कर्मचारी, क्राईम मोहरील, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला उपक्रम यशस्वी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, क्राईम मोहरील परिश्रम घेत आहेत.विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल सन्मानपूर्वक परत केल्यामुळे समाधान तर आहेच शिवाय आमची प्रतीमा उंचावून नागरिकांचा विश्वास जिंकला जात आहे. आतापर्यंत १ कोटी ९ लाख ३६ हजार ६११ रूपयांचा मुद्देमाल १५ कार्यक्रमांतून परत केला आहे. यापुढेही असे कार्यक्रम घेतले जातील. यामध्ये क्राईम मोहरीरची भूमिका खुप महत्वपूर्ण आहे.- जी.श्रीधर,पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसRobberyदरोडा