शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

हमारी छोरी छोरों से कम नही, आयुषीच्या गगनभरारीचं पंकजा मुंडेंकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:07 IST

पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आयुषीने भारतीय वायू सेनेत भरती झाल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे.

ठळक मुद्देपंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आयुषीने भारतीय वायू सेनेत भरती झाल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे.

मुंबई - भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहेत. तसा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला. या परीक्षेसाठी आजवर मुलींना संधी नाकारल्याबद्दल कोर्टाने लष्कराला फटकारले आहे. मात्र, यापूर्वी सैन्य दलातील विविध बटालियनमध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, महिला अधिकारीही देशसेवा करत आहेत. भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पकंजा मुंडेंनीही अशाच एका मराठमोळ्या लेकीच्या गगनभरारीचं कौतुक केलंय.

पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आयुषीने भारतीय वायू सेनेत भरती झाल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. तसेच, हमारी छोरी छोरों से कम नही... असेही त्यांनी म्हटलं आहे.  "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डी चे आमचे डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे त्या बद्दल तिचे अभिनंदन! आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे.', असे ट्विट पंकजा यांनी केले आहे. आपल्या गावाकडील लेकीच्या गगनभरारीचा अभिमान असल्याचं पंकजा यांनी म्हटलंय. 

मुलींना एनडीएचीही परीक्षा देता येणार

मुलींना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यासाठी संधी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका कुश कार्ला यांनी कोर्टात केली होती. पात्रता असलेल्या मुलींना संधी नाकारून एनडीए राज्यघटनेच्या १४, १५, १६ व १९व्या कलमांचे उल्लंघन करीत आहे, असा आरोप याचिकेत केला होता. ही प्रवेश परीक्षा यंदा १४ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे, आता या परीक्षेला मुलींनाही पेपर देता येणार आहे.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड