शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मावेजापोटी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्तीचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:34 IST

पाझर तलावात संपादीत जमिनीचा मावेजा लोकन्यायालयात समेट होऊनही दोन वर्षांपासून न मिळाल्याने दाखल प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश येथील तिसरे जिल्हा न्या. यु. टी. पौळ यांनी दिले.

ठळक मुद्दे१९९४ मध्ये भूसंपादन : पाडळशिंगी येथील १२ शेतकरी प्रतीक्षेत

बीड : पाझर तलावात संपादीत जमिनीचा मावेजा लोकन्यायालयात समेट होऊनही दोन वर्षांपासून न मिळाल्याने दाखल प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश येथील तिसरे जिल्हा न्या. यु. टी. पौळ यांनी दिले.जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील पाझर तलावासाठी भूसंपादन करण्यात आले होते. जि. प. च्या लघु पाटबंधारे विभागाने २९ आॅक्टोबर १९९४ रोजी जनार्दन त्रिंबक भांडवलकर व इतर १२ शेतकऱ्यांची जवळपास १० एकर जमीन संपादीत केली होती. संपादीत जमिनीच्या वाढीव मावेजासाठी शेतकºयांचा पाठपुरावा सुरु होता. या संदर्भात २५ मार्च २०१७ रोजीच्या लोकन्यायालयात २ हजार रुपये गुंठ्याप्रमाणे दरनिश्चिती होऊन वाढीव मावेजा मंजूर करण्यात आला होता. मात्र, मावेजाची ५८ लाख रुपये रक्कम शासनाकडून मिळत नव्हती.विधि सेवा सहायक समितीचे अध्यक्ष तथा तत्कालीन जिल्हा न्या. अनिल पानसरे यांनी भूसंपादन प्रकरणातील शेतकºयांना शासनाकडून मावेजा मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाला पत्राद्वारे कळविले होते. न्या. पानसरे यांच्या पत्रावरुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्र. ३४/२०१७ जनहित याचिका दाखल करुन घेण्यात आली. या प्रकरणी सुनावणी होऊन राज्य शासनाला मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या. तर या याचिकेच्या अनुषंगाने शासनाने अध्यादेश जारी केला होता. लोकन्यायालयात समेट झाला असेल तर सहा महिन्यांच्या आत संबंधित शेतकºयांना कोणत्याही परिस्थितीत मावेजाची रक्कम मिळाली पाहिजे असे नमूद होते.मात्र, पाडळशिंगीतील जमीन संपादन प्रकरणात स्थानिक प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष झाले. या कालावधीत उपविभागीय अधिकारी म्हणून विकास माने, महेंद्रकुमार कांबळे हे कार्यरत होते. त्यांनीही दुर्लक्ष केले. परिणामी शेतकºयांच्या वतीने न्यायालयात दरखास्त दाखल करण्यात आली. मात्र, झालेल्या सुनावणीच्या वेळी उपविभागीय अधिकारी तसेच शासनाचे प्रतिनिधी हजर राहिले नाही. परिणामी शेतकºयांनी न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल करुन जिल्हाधिकाºयांची कार जप्त करावी, तसेच मावेजाची रक्कम शासनाकडून मिळावी म्हणून मागणी केली. या प्रकरणात तिसरे जिल्हा न्या. यु. टी. पोळ यांनी जिल्हाधिकारी यांची कार क्र. एम. एच. २३, एएफ-०११९ जप्त करण्याबाबत आदेशित केले. या प्रकरणात आता ११ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात शेतकºयांच्या वतीने अ‍ॅड. अरुण जगताप यांनी काम पाहिले.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCourtन्यायालय