शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

बीड जिल्ह्यात पानटपऱ्या बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 23:51 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने, पान टप-या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १९ मार्च रोजी दुपारी जारी केले आहेत.

ठळक मुद्देकोरोना आपत्ती व्यवस्थापन : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणा-यांवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने, पान टप-या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १९ मार्च रोजी दुपारी जारी केले आहेत.महाराष्टÑ शासनाने ‘महाराष्टÑ कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२०’ जारी केले आहेत. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपापन करण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार, प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हाधिकाºयांनी हा आदेश जारी केला आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतचे मुख्याधिकारी तसेच ग्रामसेवकांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून दररोजचा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी जि. प. चे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपअधीक्षक (गृह) तसेच अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती अथवा संस्थांवर दंडनीय व कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.पोलीस - पालिकेचे भोंगे फिरलेगुरुवारी दुपारी जिल्हाधिकाºयांनी आदेश जारी केल्यानंतर तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. जिल्हाभरात स्थानिक यंत्रणा तसेच पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करुन पानटपºया बंद केल्या. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी पानटपºयांवर तसेच तंबाखू पदार्थाच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी झाली होती. या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे.जिल्हाभरात १४ चेकपोस्टबीड : जिल्ह्यात येणाºया प्रवाशांची मााहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील ११ तालुक्यातील मार्गावर १४ चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत.शहागड पूल, पांढरवाडी फाटा, अंभोरा फाटा, चौसाळा, माळेगाव, बर्दापूर फाटा, गंगाखेड रोड, सोनपेठ फाटा, गंगामसला, सादोळा, बोरगाव पिंपरी, मातोरी, पाथर्डी, महार टाकळी, शेवगाव, मानूर, चिंचपूर फाटा या ठिकाणी हे चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर बीड जिल्ह्यात येणा-या प्रवाशांची नोंद ठेवली जाणार आहे. यासाठी पथके निर्माण केली आहेत.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या