सिरसाळा : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी तालुक्यातील सिरसाळा येथील एमआयडीसी उभारणीच्या कामास वेग आला असून, येथील गट क्रमांक ३४३ मधील ३५ हेक्टर जमीन उद्योग विभागाने औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. या जमिनीची सोमवारी सकाळपासून मोजमापन करण्यास सुरुवात झाली होती; परंतु मोजमापास काहींनी विरोध केल्यानंतर मोजणी थांबवली होती; परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी २९ जून रोजी सकाळी पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली.
परळी-बीड मार्गावर सोनपेठ रोडवर जमीन मोजणीसाठी एमआयडीसी अधिकारी, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, एपीआय एकशिंगे, तलाठी युवराज सोळंके, यासह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या महिला पोलीस, आदींच्या उपस्थितीत मोठा बंदोबस्त होता. सुरुवातीला या जागेवर अतिक्रमण केलेल्या लोकांनी मोजमापन करण्यास विरोध दर्शविला होता. यावेळी प्रशासन व ग्रामस्थांत जोरदार खडाजंगी झाली. शासकीय जागेवर अतिक्रमण करून पुन्हा गोंधळ घातल्यास कडक कारवाई करण्याची तंबी उपविभागीय अधिकारी चाटे यांनी दिल्यानंतर प्रकरण शांत होऊन पुन्हा मोजणीसाठी जागेचे मार्किंग करण्यात आले.
===Photopath===
290621\29_2_bed_21_29062021_14.jpg
===Caption===
सिरसाळा जमीन प्रकरण