शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:34 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अहवाल : पाच जणांच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे

बीड : जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे. इतर पाच मृत्यूंची कारणे वेगवेगळी असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.सुमता देविदास बेडके (५० रा.राजापूर ता.गेवराई) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच मार्च, एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवले. पारा ४५ अंशांच्यावर गेला होता. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. याच उन्हाच्या त्रासामुळे सहा लोकांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या.यामध्ये शिवराज संदीपानराव खरसाडे (३० रा.पाचेगाव ता.गेवराई), चंद्रकांत मारूती हिरवे (४० रा.माळीवेस बीड), परमेश्वर दादाराव वाघ (४४ रा.कदमवाडी ता.बीड), विक्रम भीमराव गायकवाड (३८ रा.बनसारोळा ता केज), दत्तात्रय सुदाम चव्हाण (१६ बीड सांगवी ता.आष्टी) यांचा समावेश आहे. खरसाडे यांचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवला आहे. तर हिरवे आणि वाघ यांचा मृत्यू हृदयात रक्ताच्या गाठीने पुरेशा रक्त पुरवठ्याअभावी, गायकवाड यांचा लिव्हरवर सूज आल्याने तर चव्हाण याचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, प्रभारी अतिरिक्ति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्या मार्गदर्शनखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची चौकशी केली आहे.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाDeathमृत्यू