शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षात २९ पैकी केवळ ६ हजार नळ जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:57 IST

शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत.

ठळक मुद्देअमृत पाणीपुरवठा योजना : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून संथ गतीने काम

बीड : शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत दोन वर्षांत २९ हजारांपैकी केवळ ५ हजार ९५० कनेक्शनच देण्यात आले आहेत. यावरून हे काम संथ गतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.अमृत पाणी पुरवठा योजनेस १९ एप्रिल २०१७ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ११४ कोटी ६३ लाख रूपयांची ही योजना आहे. या निधीत केंद्र शासनाचा ५० आणि राज्य व नगर पालिकेचा २५ टक्के वाटा आहे. या कामाचा जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत झालेल्या नवीन जलवाहिनीला नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. परंतु याचे काम मजिप्रा कडून संथ गतीने सुरू आहे. सुरूवातीला दोन वर्षांत हे काम करण्याचे आदेश होते. नंतर याला एक वर्षांची मुदतवाढ देऊनही कामात गती आलेली नाही. मागील दोन ते अडीच वर्षांत केवळ ६ हजारच नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. अद्यापही २३ हजार नळ जोडण्या देणे बाकी आहेत.दरम्यान, पालिकेकडून वारंवार पत्र देऊन कामाच्या गतीबाबत कळविलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी व आयुक्तांसोबतही यावर चर्चा झालेली आहे. परंतु कारवाईत सुधारणा झालेली नाही. शुक्रवारीही याच कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्य अभियंता व नगर पालिका अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचे सांगण्यात आले आहे. यात मजिप्राच्या अधिकाºयांना कामाच्या संथ गतीबाबत चांगलेच धारेवर धरले होते. १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिक-यांनी केल्या आहेत.१० वेळा संपर्क करूनही प्रतिसाद नाहीयाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता अमोल पाटील यांच्याशी १० वेळा भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु त्यांनी एकदाही प्रतिसाद दिला नाही. तसेच उप अभियंता गौरव चक्के यांनाही तीन वेळा संपर्क केला, त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे मजिप्राची बाजू समजली नाही. यापूर्वीही संपर्क केल्यानंतर येथील अधिका-यांकडून बाजू मांडण्यास टाळाटाळ केली होती.

जिल्हाधिकारी यांच्यासोबत मजिप्रा अधिका-यांची बैठक झाली आहे. काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. काम गतीने करून पूर्ण करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे. परंतु मजिप्राकडून याला प्रतिसाद दिला जात नाही.- डॉ.भारतभूषण क्षीरसागरनगराध्यक्ष, नगर परिषद बीड

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूक