शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात राखीव जागेवर प्रवेश घ्यावयाचे आहे. त्यांना प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच शासकीय,निमशासकीय सेवेमध्ये आरक्षणाचा लाभ घेतलेले उमेदवार, शासकीय योजनांचा लाभ घेणारे मागासवर्गीय लाभार्थी उमेदवार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणारे उमेदवार इत्यादींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. ऑनलाईन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याची सुविधा शासनाने सुरु केलेली आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करावयाची कार्यपद्धती याविषयी माहिती विषद करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड तसेच प्रकल्प अधिकारी सर्वेश्वर कोठुळे, ज्ञानेश्वर ढगे, सय्यद आखेब, स्वामी पुरूषोत्तम, प्रदीप गुजर, ज्ञानोबा मात्रे, संजय गुजर, तुकाराम पिंपरीकर, भीमा कंधारे, वर्षा देशमुख आदींनी केले आहे.
जात पडताळणी समितीच्या वतीने ऑनलाईन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST