शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

बीड जिल्ह्यातील एक हजार खाजगी दवाखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:39 IST

कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. आयएमएच्या या आंदोलनाला डेंटल असोसिएशन, निमा संघटनेच्या डॉक्टरांसह रोटरी क्लबने पाठिंबा दिला. जिल्ह्यातील एक हजारपेक्षा जास्त दवाखाने आज बंद राहिल्याने बाह्यरुग्णसेवा ठप्प होती.कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टर वर झालेल्या हल्ल्यानंतर ११ जूनपासून इंडियन मेडिकल असोसिएशनने आंदोलन सुरु ठेवले आहे. वेळोवेळी डॉक्टरांवर व रुग्णालयांवर होणारे हल्ले होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय स्तरावरील कडक व प्रभावी कायदा करण्याची मागणी करत १४ जून रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बीड येथील सदस्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तर १७ जून रोजी सकाळी सहा वाजेपासून चोवीस तासांसाठी बीड मधील जवळपास ३०० आयएमए सदस्य डॉक्टरांनी आपल्या ओपीडी बंद ठेवल्या.यावेळी आयएमए हॉलमध्ये आयएमए बीडचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव डॉ. विनोद ओस्तवाल, डॉ. अमोल गीते, डॉ. योगे, महिला प्रतिनिधी डॉ. प्रज्ञा तांबडे, डॉ. सुनिता बारकुल तसेच सदस्यांनी बैठक घेऊन लवकरात लवकर प्रभावी कायदा करण्याची मागणी केली. डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. सी. ए. गायकवाड, डॉ. व्ही. एल. जाधव, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. यंदे, डॉ. वांगीकर, डॉ. सचिन जेथलिया, डॉ. सुभाष जोशी, डॉ. खरवडकर, डॉ. विनिता ढाकणे, डॉ. रेश्मा चव्हाण यांनी आपली मते मांडली.आयएमएच्या बंदला पाठिंबा देत निमाच्या ३०० सदस्यांनी सहभाग नोंदवल्याचे अध्यक्ष डॉ. अजित जाधव यांनी सांगितले. तर इंडियन डेंटल असोसिएशनच्या बीड शाखेतील ७० सदस्यांनीही त्यांचे दवाखाने बंद ठेवून या संपात भाग घेतला असे अध्यक्ष डॉ. प्रविण ढगे व सचिव डॉ. शहाजी जगताप यांनी कळवले आहे.सोमवारी २४ तासांसाठी परळी शहरातील सर्व खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी बंद होती, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजित केंद्रे व सचिव विजय रांदड यांनी दिली. दरम्यान बंदमध्ये परळी मेडिकल असोसिएशन सहभागी झाल्याचे डॉ. एल. डी. लोहिया आणि डॉ. दिपक मुंडे यांनी सांगितले. दुचाकी रॅली काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी डॉ. केंद्रे, डॉ. रांदडसह डॉ. ज्ञानेश्वर घुगे, आयएमएचे सदस्य बालासाहेब कराड, शालिनी कराड, सूर्यकांत मुंडे, मधुसूदन काळे, शामसुंदर काळे, वैशाली सचिन भावठणकर, संजय गीते ,संतोष मुंडे, गुरु प्रसाद देशपांडे, तुषार पिंपळे, बाहेकर, विवेक दंडे, संतोष मुंडे, अशोक लोढा, दिनेश लोढा, आघाव, सतीश गुट्टे, राजेश जाजू, रविंद्र इटके, देशमुख, रामधन कराड, अशोक मंत्री, मुकुंद सोळुंके, दीपक पाठक, विजय जाजू, धु्रवनारायण तोतला,अमोल चाटे, अर्षद , मोसीन खान, संदीप घुगे, प्रवीण खाडे, वाल्मीक मुंडे आदी सहभागी झाले होते.केजमध्ये डॉ. त्र्यंबकराव चाटे, डॉ. सय्यद डॉ. बालासाहेब सावंत आदींसह डॉक्टरांनी तहसीलदार मेंडके यांना निवेदन दिले. अंबाजोगाईत डॉ. राजेश इंगोले, डॉ. अनिल भुतडा, डॉ. विजय लाड यांच्यासह शहरातील डॉक्टरांनी प्रशासनाला निवेदन दिले.गेवराई : येथे डॉक्टर संघटनेने दवाखाने बंद ठेवून तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सर्वोत्तम शिंदे, डॉ. हरूण देशमुख, डॉ.बाळासाहेब चाळक, डॉ. मनोज मडकर, डॉ.आबेद जमादार, डॉ.विजय सिकची, डॉ. दामोदर कुटे, अनिल दाभाडे, अनिल वाघवाणी, प्रदीप राठोड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंपMedicalवैद्यकीयagitationआंदोलन