शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उसने दिलेली लाखोंची रक्कम बुडाल्याने एकाची आत्महत्या; सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:39 IST

परिचयातील व्यक्तींना विविध कामासाठी उसनी दिलेली लाखोंची रक्कम परत देण्यास त्यांनी नकार दिल्याने निराश झालेल्या शिरूर घाट येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंदविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : परिचयातील व्यक्तींना विविध कामासाठी उसनी दिलेली लाखोंची रक्कम परत देण्यास त्यांनी नकार दिल्याने निराश झालेल्या शिरूर घाट येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंदविण्यात आला आहे.केज तालुक्यातील शिरूर घाट येथील सुंदर तांबडे यांनी गावातील अनेकांना उसने पैसे दिलेले होते. परंतु, लातूर येथे ठेवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना पैशांची गरज भासू लागली. त्यामुळे ११ आॅक्टोबर रोजी गावातील नारायण देवा लोंढे याच्याकडे जमिनीच्या व्यवहारातील बाकी राहिलेली साडेतीन लाखांची रक्कम मागितली. परंतु, नारायण लोंढे याने पैसे देण्यास साफ नकार दिला आणि शिवीगाळ करून तांबडे दांपत्याला हाकलून दिले.त्यानंतर अशोक उत्तम गायकवाड याला दवाखान्यासाठी उसने दिलेली चार लाखांची रक्कम परत मागितली. परंतु गायकवाड याने पैसे देणार नाही असे सांगत पुन्हा पैसे मागितलेस तर अ‍ॅट्रॉसिटी करीन अशी धमकी दिली. बानेगाव येथील सिद्धू चंदू मोराळे यालाही तांबडे यांनी उसने पाच लाख रुपये दिले होते. त्याच्याकडेही मागणी केली असता त्यानेही सुंदर तांबडे यांना पैसे न देता बाहेरचा रस्ता दाखविला. यामुळे हताश झालेले तांबडे दांपत्य गावाकडे परतले आणि रात्रीच्या वेळी भावाच्या घरी थांबले.लोकांनी माझे पैसे बुडविल्याने मला आता मरणाशिवाय पर्याय नाही, अशी खंत सुंदर तांबडे यांनी कुटुंबियांसमोर बोलून दाखविली. कुटुंबियांनी त्यांची कशीबशी समजूत घातली.यानंतरही १२ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास सुंदर यांनी शेतातील घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, दोर तुटल्याने ते जमिनीवर पडले. बेशुद्धावस्थेतील सुंदर यांना कुटुंबियांनी उपचारासाठी आधी बीड आणि नंतर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.४० वाजता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे सुंदर यांची पत्नी मनीषा तांबडे यांनी केज पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पोलिसांना मिळाली मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठीदरम्यानच्या काळात सुंदर यांनी मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असता त्यात वरील तिन्ही आरोपी सोबत जय लोंढे, सुधाकर घोडके, अंकुश झुंबर मोराळे आणि बालू मोराळे (फौजी) या चौघांनीही पैसे बुडविल्याचा उल्लेख आहे. परंतु, या चौघांनी पैसे घेतले होते किंवा नाही याबाबत माहिती नसल्याचे देखील मनीषा तांबडे यांच्या फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सातही आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीMurderखून