शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियमांचा भंग केल्याने रुग्णालयाला एक लाखाचा दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:15 IST

जैविक कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही

बीड : प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील डॉ. राव यांच्या रिसर्च सेंटरला एक लाखांचा दंड मुख्य न्यायदंडाधिकारी जागृती भाटिया यांच्या न्यायालयाने ठोठावला. प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली रुग्णालयाला दंड होण्याचे हे  जिल्ह्यातील दुसरे प्रकरण आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २००७ मध्ये शहरातील तत्कालीन राव रिसर्च सेंटर (सुभाष रोड येथे हे रुग्णालय व रिसर्च सेंटर होते) आणि लाईफ लाईन हॉस्पिटलवर छापे मारुन तपासणी केली होती. तेथे प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार आवश्यक यंत्रणा नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.  रु ग्णालयात जैविक आणि इतर कचरा स्वतंत्र ठेवणे तसेच तो नष्ट करण्याची यंत्रणा आवश्यक असते. सिरींज, सलाईन, इतर सुटे भागाच्या विल्हेवाटसंबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील न्यायालयात  खटला दाखल केला होता.  प्रदूषण नियंत्रण कायद्यातंर्गत ५ वर्षाची शिक्षा अथवा एक रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

या प्रकरणात मुख्य न्याय दंडाधिकारी जागृती भाटिया यांच्यासमोर सुनावणी झाली. डॉ. राव यांनी त्रुटींची कबुली दिल्यामुळे न्यायालयाने १३ डिसेंबर रोजी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रुग्णालयाच्या वतीने डॉ. राव यांनी ही दंडाची रक्कम भरली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अ‍ॅड. मंगेश पोकळे यांनी बाजू मांडली.

जिल्ह्यात दुसरे प्रकरण रुग्णालयाला दंड होण्याचे हे जिल्ह्यातील दुसरे प्रकरण आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण नियमांचा भंग केल्याप्रकरणी नियंत्रण मंडळाच्या वतीने दोन खटले दाखल केले होते. यातील क्र. २७०/ २००८ प्रकरणात लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वतीने डॉ. अनिल सानप यांनी त्रुटींची कबुली दिली होती. सुनावणीपूर्व तडजोडीखाली न्यायालयाने ९ आॅक्टोबर २०१९ रोजी रुग्णालयास एख लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

टॅग्स :pollutionप्रदूषणBeedबीडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर