शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विडा येथे मारहाणीत एकाचा मृत्यू; तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:31 IST

विडा येथे भांडणात एकाचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील विडा येथे भांडणात एकाचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयतासह त्याचे भाऊ आणि वडिलांच्या विरोधात अ‍ॅट्रासिटी व मारहाणीचा असे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यातील विडा येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता धनराज गोपीनाथ गायकवाड (वय ५० वर्ष) यास नंदा माने व तिचा मुलगा करण माने व त्यांचा नातेवाईक संतोष अहिरे यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत धनराज खाली पडताच त्याच्या छातीवर पोटावर आणि अवघड ठिकाणी या तिघांनी जबर मारहाण केली. यात धनराज बेशुद्ध झाले होते. त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेला धनराज याचा भाऊ शामसुंदर गायकवाड व शुभांगी गायकवाड यांना ही मारहाण करण्यात आली .नंदा माने यांची विवाहित मुलगी ही तिच्या नवºयासोबत सासरी नांदत नसून ती धनराज गायकवाड याचा मुलगा शुभम गायकवाड यांच्या सोबत पळून गेली होती. तिला तिच्या नवºयापासून पाच वर्षाची एक मुलगी देखील आहे. त्याचा राग मनात धरून आणि आमची मुलगी आमच्याकडे द्या म्हणून नंदा माने, तिचा मुलगा व संतोष अहिरे यांनी धनराज गायकवाड यांच्या कुटुंबियांसोबत भांडण झालेभांडणात झालेली मारहाण धनराज याच्या मृत्यूस कारणीभूत असून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध मयताची पत्नी शुभांगी धनराज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन केज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, रविवारी झालेल्या भांडणातून मंदा माने हिने केज पोलीस स्टेशनला रविवारी मयत धनराज गायकवाड, त्यांचा भाऊ शामसुंदर गायकवाड आणि वडील गोपीनाथ किशन गायकवाड यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले हे करीत आहेत.पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचलेया प्रकरणात मयत झालेले धनराज गायकवाड यांची पत्नी शुभांगी हिने पतीच्या वियोगामुळे रात्री दोनच्या सुमारास गावाजवळच्या विहिरीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु त्याची चाहूल लागताच रात्रीच्या गस्तीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आणि पो.ना. अमोल गायकवाड यांनी तिचे प्राण वाचविले.गुन्हा दाखल होईपर्यंत घेतले नाही प्रेत ताब्यातआरोपीविरुद्ध पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाहीत,असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरच पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी देण्यात आले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी