शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचे नवे-जुने कार्यकर्ते, नेते मंडळी नमिता मुंदडा यांच्या प्रचारात झाली सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:47 IST

केज विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नवे व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचाराला लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात डोअर-टूृ-डोअर प्रचार यंत्रणा सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाला वाढता पाठिंबा मिळू लागला आहे.

ठळक मुद्देशहरी व ग्रामीण भागात डोअर टू डोअर सुरू झाला मतदारांशी संपर्क, उत्स्फूर्त प्रतिसाद

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नवे व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचाराला लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात डोअर-टूृ-डोअर प्रचार यंत्रणा सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाला वाढता पाठिंबा मिळू लागला आहे.केज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमिता अक्षय मुंदडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची प्रचारयंत्रणा सक्रिय झाली असून जोमाने कामाला लागली आहे. अंबाजोगाई शहर, केज, नेकनूर व ग्रामीण भागात भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे संचालक अशी मोठी यंत्रणा प्रचारात उतरली आहे.मुंदडा कुटुंबिय गेल्या ३० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहे. कै. डॉ. विमल मुंदडा यांनी सलग २५ वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महिला व बाल विकास मंत्री, अशा विविध खात्यांच्या मंत्री म्हणून त्यांनी मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट केला. त्यांच्या अकाली निधनामुळे मुंदडा परिवार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिला. आता पुन्हा नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून मुंदडा परिवाराने केज मतदार ंसंघात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा हे सातत्याने जनतेच्या सुख-दु:खात सहभागी असतात. याची मोठी सहानुभूती मुंदडा परिवाराच्या पाठिशी आहे. या शिवाय बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, यांचे पाठबळ पुन्हा मुंदडा कुटुंबियांच्या पाठीशी भक्कम उभे राहिल्याने ही मुंदडासाठी भक्कम जमेची बाजू आहे, अशी चर्चा मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे.मुंदडा परिवाराचा राजकीय पिंड हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा आहे. सत्तेत असताना आणि नसतानाही या परिवारात कधी अहंकार पहावयास मिळाला नाही. सर्वसामान्यांच्या सुखदु:खात ते नेहमीच सहभागी झाले, अशी प्रतिक्रियाही ऐकावयास मिळत आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा