शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

१० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या गळाला ‘बडा मासा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:04 IST

मत्स्य व्यवसायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. गुरुवारी दुपारी तीन वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही कारवाई झाली.

ठळक मुद्देबीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारवाई

बीड : मत्स्य व्यवसायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. गुरुवारी दुपारी तीन वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही कारवाई झाली.

गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील शहादत मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या, बंगाली पिंपळगाव या संस्थेला तलावाचा ठेका देण्यासाठी संबंधित तक्रारदार हा नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन तुंबारेकडे रोज खेटे मारत होता. परंतु तो आज-उद्या करून चालढकल करीत असे. त्यानंतर त्याने ठेका आदेश देण्यासाठी २० हजार रूपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. याची खात्री एसीबीकडून करण्यात आली. गुरूवारी दुपारी तुंबारेने लाचेची मागणी करून १० हजार रूपये स्विकारले. याचेवळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी त्याला झडप घालून पकडले. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, श्रीराम खटावकर, विकास मुंडे, सुशांत सुतळे, राकेश ठाकूर, सय्यद नदीम आदींनी केली.

पैसे घेण्यासाठी तुंबारे भर उन्हात तक्रारदारच्या प्रतीक्षेततुंबारे हा वर्ग दोनचा अधिकारी आहे. त्याने तक्रारदाराला तात्काळ शिवाजी चौकात पैसे घेऊन बोलविले. एसीबीने त्याप्रमाणे ‘जाळे’ टाकले होते. बसस्थानकाच्या बाजूने जाणाºया नवीन झालेल्या सिमेंट रस्त्यावर तोतक्रारदारची भर उन्हात प्रतीक्षा करीत होता. तक्रारदाराकडून लाच स्वरूपात दहा हजार रुपये स्वीकारताच एसीबीने टाकलेल्या जाळ्यात तो अलगद सापडला.

या बड्या ‘माशाने’ यापुर्वीही अनेकांकडून लाच स्वरूपात माया गोळा केल्याचे बोलले जात आहे. केवळ तक्रार नसल्याने तो यामध्ये यशस्वी झाला. अखेर गुरूवारी हा मासा जाळ्यात अडकला.

सहायक आयुक्त पदाचा अतिरक्त पदभारही तुंबारेकडेचएसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या बड्या माशाकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे छोटे-मोठे काम असले तरी तुंबारे त्यांच्याकडून लाचेची मागणी करीत असे, असे समजते. त्याच्या लाचखोरीला मत्स्य व्यवसायिक आणि ठेकेदार वैतागलेले होते.