शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

बीड जिल्ह्यात बाहेरच्या गुन्हेगारांचे उपद्व्याप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:10 AM

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे गुन्हेगार बीड जिल्ह्यातील नसून शेजारील जिल्हा व कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार व इतर राज्यांतील असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आलेले आहे. परंतु बाहेरचे गुन्हेगार बीड जिल्ह्यात उपद्व्याप करीत असल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून दिसून येते.

ठळक मुद्देचोरी, दरोडे, लुटमारीत अग्रेसर : बीड जिल्ह्यातील गुन्हेगार आहेत जेरबंद

बीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे गुन्हेगार बीड जिल्ह्यातील नसून शेजारील जिल्हा व कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार व इतर राज्यांतील असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आलेले आहे. परंतु बाहेरचे गुन्हेगार बीड जिल्ह्यात उपद्व्याप करीत असल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून दिसून येते.

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांना रस्त्यात आडवून त्यांच्या अंगावर गाडी घालून ठार केले. त्यानंतर त्यांच्याजवळील साडेचार लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची पिशवी घेऊन लुटेरे पसार झाले. यातील एक चोरटा हा विहिरीत पडला होता. त्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी इतर तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता ही एक कुख्यात गुन्हेगारांची टोळी असल्याचे समोर आले.

विहिरीत पडलेला अमोल उर्फ आर्याभाई संभाजी मोहिते (रा. कोल्हापूर) हा टोळीचा म्होरक्या असल्याचे समोर आले. याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल २० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी मोकाही लावलेला आहे. याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी सुतार हा कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील रहिवाशी होता. या गुन्ह्यात ही टोळी परराज्यातील असल्याचे समोर आले.

साधारण दोन महिन्यांपूर्वी परळी शहरातही एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्या होत्या. यामध्ये नागरिकांच्या सजगतमुळे दोन चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आले होते. हे चोरटे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे तपासातून समोर आले. तसेच गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे आठवड्यापूर्वी साखरे कुटुंबावर हल्ला करून ऐवज लंपास करणारे लुटारूही शेजारील जिल्ह्याचे आहेत. पोलिसांना त्यांची नावे समजली असली तरी अद्याप त्यांना ताब्यात घेण्यात यश आलेले नाही.

अंबाजोगाई न्यायालयाचा तपास अद्याप रखडलेलाच असला तरी याच शहरातील एका कुटुंबाला चाकुचा धाक दाखवून लाखो रूपये लुटल्याची घटना घडली होती. यामध्ये एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याला ताब्यात घेतल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. परंतु त्याचा साथिदार हा परभणी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले.

तसेच माजलगाव येथेही कपड्याचा ट्रक लुटला होता. पोलिसांनी तपास लावल्यानंतर हे चोरटे दुसºया राज्यातील असल्याचे समजले. या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यात घडणाºया गुन्ह्यांमध्ये शेजारील जिल्हे व परराज्यातील टोळीचा हात असल्याचे समोर येत आहे.बीडमधील आरोपींवर मोका, एमपीडीए, तडीपारजिल्ह्यात असणाºया गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. आतापर्यंत दोन टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाºया आरोपींवर एमपीडीए व तडीपारची कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगार बºयापैकी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हानजिल्ह्यातील गुन्हेगारांना पकडण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. परंतु बाहेर राज्यातून अथवा शेजारील जिल्ह्यातून येऊन बीड जिल्ह्यात गुन्हे करणाºयांवर वचक बसविणे पोलिसांसमोर आव्हान आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व संबंधित पोलीस ठाण्यांचे पथके नेहमीच वेगवेगळ्या राज्यात तपासासाठी गेलेले आढळून येतात.

नेमकं कोण कमी पडतंय ?जिल्ह्यात गुन्हेगारी करणारे आरोपी हे अहमदनगर, जालना, परभणी, उस्मानाबाद, कर्नाटक, मध्यप्रदेश, बीहार, पुणे आदी ठिकाणचे आहेत. हे आरोपी पकडण्यात तेथील स्थानिक पोलिसांना यश येत नाही की जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात बीड पोलीस अपयशी ठरताहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये वचक ठेवण्यात यशजिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बीड पोलसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधक पथक व पोलीस ठाणे यांच्या परिश्रम कामी आले.परंतु आजही अनेक अधिकारी, कर्मचारी कर्तव्यात हालगर्जीपणा करीत असल्याचे दिसते. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते, हे ही तितकेच खरे.