शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवा ज्येष्ठतेसाठी परिचारिकांची आरोग्य उपसंचालकांकडे कैफियत; आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:28 IST

उपसंचालकांच्या कार्यालयापुढेच ठिय्या मांडण्याचा इशारा 

बीड : बंधपत्रित परिचारिकांच्या मूळ दिनांकापासून सेवा नियमित करून सेवा ज्येष्ठतेचा लाभ देण्याच्या मागणीसाठी परिचारिकांनी लातूर उपसंचालकांकडे कैफियत मांडली आहे. मागण्या मान्य न झाल्यास  २ मार्च रोजी उपसंचालकांच्या कार्यालयापुढेच ठिय्या मांडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यात बीडसह लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील परिचारिकांचा समावेश आहे.

२००५ सालच्या अगोदर ज्या परिचारिका बंधपत्रित होत्या, त्यांना रुजू झाल्यापासून सेवेत घेण्यात आले नव्हते. त्या जेव्हापासून नियमित झाल्या, तेव्हापासून त्यांची सेवा ज्येष्ठता दिली आहे. विशेष म्हणजे इतर विभागातील सर्वांना बंधपत्र झाल्यापासूनच ज्येष्ठता देण्यात आलेली असून केवळ लातूर विभागातच ती दिली नसल्याचे परिचारिकांनी निवेदनात म्हटले आहे. 

दरम्यान, याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, संचालक, उपसंचालकांना निवेदने देण्यात आली. परंतु अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. याबाबत त्यांनी २२ जानेवारीलाच संचालकांना उपोषणाबाबत निवेदन दिले होते. परंतु काहीच न झाल्याने त्यांनी बुधवारी उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांची लातूरला जावून भेट घेत समस्या मांडल्या. आता या परिचारिकांनी आक्रमक स्वरूप धारण केले असून २ मार्चला लातूरच्या उपसंचालक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे, सत्वशीला मुंडे, शाईन मॅथ्यू, सुरेखा लष्करे, नीलेश जाधव, पूनम धनवटे, रंजना दाणे, जान्हवी दुदवडकर, अनंत वायझोडे, मीनाक्षी ठोकळ, वैशाली गुरव, मंगेश शिरसाट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपसंचालक (नर्सिंग) डॉ.चव्हाण यांच्याशी संपर्क केला, परंतु त्यांनी फोन घेतला नाही.

वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविलापरिचारिकांचे निवेदन मिळाले आहे. यावर कारवाई करण्याबाबत शिफारस करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सकारात्मक कारवाई करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.     - डॉ.एकनाथ माले, उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर

... तर २ मार्चला उपोषण करूवारंवार निवेदन दिले. परंतु अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. आता २ मार्चला उपोषण करण्याबाबत आम्ही २२ जानेवारीलाच निवेदन दिले आहे. आमच्या मागण्या मान्य करून अन्याय दुर करावा, एवढीच अपेक्षा आहे.     - सत्वशिला मुंडे, उपाध्यक्षा,  महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना 

टॅग्स :Medicalवैद्यकीयBeedबीडagitationआंदोलन