शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची परिचारिकेला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 17:12 IST

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं एक तास काम बंद आंदोलन

बीड : माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत अधि-परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. सोडवण्यासाठी गेलेल्या परिचारिकेलाही मारहाण झाली. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये अनिता रावण कांबळे यांची बुधवारी रात्री ड्युटी होती. त्यांच्याच वार्डमध्ये शेख शमीम नावाची महिला रुग्ण तापेच्या आजारामुळे दोन दिवसांपूर्वी दाखल झाली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास शेख यांचा मुलगा रुग्णालयात आला. माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत त्याने कांबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी सूचना न दिल्यामुळे मी सलाईन लावू शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने कांबळे यांचा हात पकडला. कांबळे यांनी तात्काळ हा प्रकार परिसेविका संगीता दिंडकर यांना कळवला. त्यांनी कर्मचाऱ्यांसह वॉर्डमध्ये धाव घेतली. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करताच आरोपीने दिंडकर यांचाही हात पकडून मुरगाळला. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या शारदा गायकवाड यांनाही आरोपीने धक्काबुक्की केली.रुग्णालयात घडलेला हा प्रकार समजल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी धाव घेताच आरोपीने तिथून पलायन केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना प्रकार सांगण्यात आला. रात्रीच्या सुमारास त्यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात शेख शमीम यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधि-परिचारिका व परिसेविकेला धक्काबुक्की झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक तास कामबंद आंदोलन केले. मात्र त्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणडॉक्टर, परिचारिका आपल्याकडे लक्ष देत नाहीत, सलाईन लावत नाहीत, इंजेक्शन देत नाहीत असा गैरसमज रुग्ण व नातेवाईकांमध्ये असतो. मात्र, गरज नसताना असे उपचार करणे धोक्याचे असू शकते. याच गैरसमजुतीतून वाद उद्भवतात. बुधवारचा प्रकारही असाच काहीसा होता. या घटनेमुळे मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBeedबीड