शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:45 IST

बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेमध्ये देशभरातील ४५०० शहरांचा समावेश; महाराष्ट्रातून २७ वा क्रमांक

बीड : बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे.केंद्र शासनाने २०१४ साली स्वच्छ सर्वेक्षण ही मोहीम हाती घेतली. सुरूवातीला देशातील केवळ ४४० शहरांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये बीड पालिकेने ३०२ वा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर यात जनजागृती वाढविण्यासह जास्त शहरांना सहभागी करून घेण्यात आले. बीड पालिकेनेही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून २०१७ च्या मोहिमेत ३०२ वा तर २०१८ च्या मोहिमेत ११० व्या क्रमांकावर झेप घेतली. ही यशाची परंपरा पालिकेने कायम ठेवली. २०१९ च्या मोहिमेत ४ हजार ५०० शहरांशी स्पर्धा करीत ९४ वा क्रमांक पटकावला. तर राज्यात २७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, प्रभारी मुख्याधिकारी मिलींद सावंत, उपअभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, महादेव गायकवाड, ज्योती ढाका, भारत चांदणे, शहर समन्वयक विश्वजीत राऊत, कर्मचारी रमेश डहाळे, रमा शिनगारे, स्वाती कागदे, सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मुकादम, कामगारांनी यासाठी परिश्रम घेतले.असे केले होते नियोजनशहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शहरातील २७ ठिकाणे निश्चित करून एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले. नागरिकांना माहिती देण्याबरोबरच न ऐकणाऱ्यांवर कारवाया केल्या. अनेकांवर फौजदारी गुन्हेही दाखल केले. तसेच ओला व सुका कचारा वेगळा केला. ओला कचºयापासून गांडूळ खत निर्मिती केली. कचरा वेगळा करणाऱ्यांसाठी बक्षिसे ठेवून प्रोत्साहित केले. केलेल्या कागदपत्रांची मांडणी करण्याबरोबरच आॅनलाईन माहिती परिपूर्ण भरली. रस्त्यावर कचरा टाकणाºया डॉक्टर, मंगल कार्यालयांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले.घंटागाडीला स्पीकर बसवून जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छतेचे आवाहन केले. पालिकेतील शिपायापासून ते मुख्याधिकाºयांपर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरून काम केले. स्वच्छता दूत नियुक्त केले. खाजगी संस्था मदतीला घेतल्या.अतिक्रमणे हटविण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग्ज धारकांवर कारवाई केली. यासारखे नियोजन केल्यामुळेच पालिका टॉप १०० मध्ये आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडMuncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान