माजलगाव शहरात घरोघरी शौचालय व्हावे यासाठी दोन वर्षांपूर्वी मोठे अभियान राबविण्यात आले. ज्यांच्या घरी शौचालय नाही, त्यांना केंद्र सरकारच्या वतीने शौचालय उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. शहरात घरोघरी शौचालय झाल्यानंतर सार्वजनिक शौचालयाची गरज नसतांना शहरात नगरसेवकांना खूष करण्यासाठी १३-१४ ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आले. हे शौचालय अनेक ठिकाणी नागरी वस्ती नसतांना देखील उभारण्यात आले. प्रत्येक सार्वजनिक शौचालयावर ४ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.
ऐवढया मोठ्या प्रमाणावर शौचालयावर खर्च केलेले असतांना या शौचालयाची एका महिण्यातच दैयनीय अवस्था झाली होती. या शौचालयाच्या सर्व दरवाज्यांची मोडतोड करण्यात आली. याठिकाणी बेसीन व शौचालयाच्या भांड्यांची अत्यंत दैयनीय अवस्था झाली असुन सर्व बेसीन फोडुन टाकण्यात आले आहेत. शौचालयात वापण्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणुन सिंटेक्स टाकी काही शौचालयावर ठेवण्यात आल्या तर काही शौचालयावर ठेवण्यातच आल्या नाहीत.
शहरात सार्वजनिक शौचालयावर जवळपास ५० ते ६० लाख रुपये खर्च करून शौचालय उभारण्यात आले मात्र १-२ शौचालय वगळता एकही शौचालय दोन वर्षात वापरात आलेले नाही.
सध्या या शौचालयासमोर मोठ्या प्रमाणावर घाण साचली असुन अनेक ठिकाणी झाडे उगवली आहेत. यामुळे याठिकाणी जाणेही मुश्कील झाले आहे.
नगरपालिकेने शहरात जागोजागी उभारलेल्या सार्वजनिक शौचालयाची सध्या अत्यंत दैयनीय अवस्था झालेली असुन या शौचालयाचे दरवाजे , शौचालयाचे भांडे, बेसीन आदि टुटलेले - फुटले आहेत. ज्या एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सिंटेक्स टाकीची व्यवस्था केली होती, त्याला पाईप जोडलेले नव्हते.
वापरातच नसलेल्यांवर पुन्हा खर्च कशाला
शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली. परंतु लोकवस्तीच्या ठिकाणी नसलेल्या या शौचालयावर पुन्हा दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केला तरी या शौचालयाचा वापर कोण करणार आहे. केवळ पैसे काढण्यासाठी ही खटाटोप केली जात असेल तर यावर पुन्हा खर्च करू नये, अशी मागणी शहरातील नागरिकातून होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी जे शौचालय झाले आहेत. त्याची अवस्था दैयनीय झाल्याने ते वापरात येऊ शकत नसल्यामुळे त्याची डागडुजी करण्यासाठी आम्ही अंदाजपत्रक तयार केले असुन ते मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे.
विशाल भोसले, मुख्याधिकारी नगर परिषद, माजलगाव
===Photopath===
080321\img_20210228_104851_14.jpg