शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आता पाणी आहे पण वीज नाही, माजलगावात ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने शेतक-यांना दिली दीड महिन्याची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:16 IST

परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे.

ठळक मुद्देनादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

- पुरुषोत्तम करवा

माजलगांव ( बीड ) : परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. याच अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

माजलगाव उपविभागांतर्गत आजमितीला जवळपास ३० ते ४० शेतीपंपासाठी असणारे ट्रान्सफार्मर जळालेले आहेत. त्यात १५, २५, ६३ आणि १०० चे ट्रान्सफार्मर आहेत. साधारणत: ६३ चे ट्रान्सफार्मर हे जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. खरीपाचे पीक हे वेळेत पाऊस न पडल्यामुळे हातचे गेले. मात्र पुढील काळात परतीच्या पावसाने  तालुक्यात पाण्याची मुबलक प्रमाणात सुबत्ता झाल्यामुळे शेतकरी आता या पाण्यावर पीक घेवून गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच ‘ओव्हरलोडींग’मुळे ट्रान्सफार्मर जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  बड्या नेत्यांना, पुढा-यांना तसेच वशिला असणा-यांना व पैसे देणा-यांना हे अधिकारी लगेचच ट्रान्सफार्मरची व्यवस्था करीत आहेत. मात्र आम्ही मागील २० ते २५ दिवसांपासून खेटे घालत असून देखील आम्हाला ट्रान्सफार्मर मिळत नसल्याच्या प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या माजलगाव उपविभागातील ४० ते ५० टक्के ट्रान्सफार्मर जळालेल्या अवस्थेत आहेत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. 

ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी औरंगाबाद व पंढरपूर या ठिकाणच्या एजन्सीला काम देण्यात आलेले आहे. या एजन्सींचे अंतर दूर पडत असल्याने ट्रान्सफार्मर मिळण्यास उशीर होत आहे त्यामुळे शेतक-यांना दोन-दोन महिने ट्रान्सफार्मर मिळण्यास अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे याकडे सत्ताधारी, विरोधकांसह पुढा-यांचेही दुर्लक्ष आहे.

अधिकारी देताहेत ओव्हरलोडींगचे कारण वास्तविक पाहता ट्रान्सफार्मर बसवितांनाच यावर किती लोड आहे त्यानुसार ट्रान्सफार्मर बसविला जातो. मात्र, आता शेतक-यांकडुन सातत्याने ट्रान्सफार्मर बसवण्याचा रेटा पाहता ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत असल्याचे कारण देऊन महावितरणचे अधिकारी अंग झटकत आहेत. 

एजन्सी आणि महावितरणमध्ये वाद 

महावितरणचे अधिकारी एजन्सी लवकर ट्रान्सफार्मर देत नसल्याने एजन्सीवर खापर फोडत आहेत. तर एजन्सीधारक हे महावितरण आमचे पैसे वेळेवर देत नाहीत त्यामुळे आम्हाला मटेरियल खरेदीला अडचणी येत असल्याचे सांगुन हात वर करीत आहेत. एजन्सी आणि महावितरणच्या या वादात शेतकरी मात्र भरडला जात आहे. 

सर्वत्र पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत आहेत. तसेच ट्रान्सफार्मर एजन्सीच या बाहेरगावी असल्याने त्यांच्या उपलब्धतेला वेळ लागतो. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागु शकतो.- प्रदिप निकम, उपविभागीय अभियंता, महावितरण माजलगांव