शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

आता मोबाईलवर समजणार गंभीर रुग्णांची प्रकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

बीड : जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांची माहिती आता संबंधित डॉक्टरांना मोबाईलवर समजणार आहे. यासाठी वॉर्ड क्रमांक ५ ...

बीड : जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांची माहिती आता संबंधित डॉक्टरांना मोबाईलवर समजणार आहे. यासाठी वॉर्ड क्रमांक ५ व ६ मध्ये ५० खाटांवर यंत्र कार्यान्वित केले आहेत. रविवारी याला सुरुवातही झाली आहे. आरोग्य विभागाने तंत्रज्ञानाचा आधार घेत कामाचा ताण हलका केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी वॉर्डमध्ये जावून याचा आढावा घेतला.

जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सुविधा देण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांच्या ड्युटी लिस्ट, सुविधा, उपचार यात सुसुत्रता आणल्यानंतर नातेवाईकांचा वावर कमी करण्यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थिनींची बेड असिस्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपचारातही गतिमानता यावी व डॉक्टरांची धावपळ कमी होऊन गंभीर रुग्णांवर जास्त लक्ष देता यावे, यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक ५ व ६ मध्ये ५० खाटांवर यंत्र कार्यान्वित केले आहेत. हे यंत्र ऑक्सिजन लेव्हल, रुग्ण गंभीर आहे की नाही आदी माहिती देत आहे तसेच रुग्णांची सर्व माहिती एका क्लिकवर समजणार आहे. यासाठी जवळपास २५ डॉक्टर, नर्सेसला प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही सर्व माहिती वरिष्ठ सर्वच अधिकाऱ्यांना आपल्या मोबाईलवर समजणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सर्वच खाटांवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी यासाठी प्रयत्न केले होते. महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे समन्वयक अमित कोठावळे यांनी बीड आरोग्य विभागाला यात मदत केली आहे.

.....

गंभीर रुग्णांची प्रकृती लवकर समजावी, यासाठी हा प्रयोग सध्या ५० खाटांवर करण्यात आला आहे. मी याची पाहणी केली असून उपक्रम छान आहे. आता आमच्यासह काही ठरावीक डॉक्टरांना आपल्या मोबाईलवर रुग्णांची प्रकृती समजणार आहे. याबाबत सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर खाटांवरही असे नियोजन केले जाईल. यासाठी अमित कोठावळे यांनी मदत केली.

डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी। बीड.

===Photopath===

300521\30_2_bed_8_30052021_14.jpeg~300521\30_2_bed_7_30052021_14.jpeg

===Caption===

प्रत्येक खाटाला अशाप्रकारे मॉनिटर लावण्यात आले आहेत.~जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी रविवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयात जावून खाटांवर कार्यान्वित केलेल्या यंत्राची पाहणी केली.