शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात जाण्याच्या तयारीतील कुख्यात गुंडाच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:39 IST

बीड : कानून के हाथ लंबे होते है हे आपण नेहमी ऐकतो. परंतु त्याचा प्रत्यय बीड पोलीस दलाने दिला ...

ठळक मुद्देबीड पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती : दरोडा प्रतिबंधक, स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी

बीड : कानून के हाथ लंबे होते है हे आपण नेहमी ऐकतो. परंतु त्याचा प्रत्यय बीड पोलीस दलाने दिला आहे. शिक्षक सय्यद साजेद अली अन्सार हत्या प्रकरणातील मास्टरमार्इंड गुज्जर खान याला परराज्यात व जिल्ह्यात पाळत ठेवून मंगळवारी अटक केली आहे. गुज्जर खान हा पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच त्याच्या दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळल्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरातील बालेपीर परिसरात शिक्षक सय्यद साजेद अली अन्सार यांचा १९ सप्टेंबर रोजी धारदार शस्त्राने खून करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील ११ आरोपींना एका आठवड्यात दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच शिवाजीनगर पोलिसांनी हैदराबाद व इतर जिल्ह्यातून अटक केली होती. याचवेळी हैदराबाद येथे गुज्जर हा असल्याची खात्रीलायक माहिती दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, संदीप साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांचे पथक तेथे पोहचले. एका घरात गुज्जर याचा भाचा, या प्रकरणातील आरोपी नासेर हा लपल्याची माहिती होती. पोलीस पाळतीवर असल्याची कुणकुण लागताच नासेरने तेथून पळ काढला.दरम्यान, जाधव यांनी हैदराबाद शहरात नासेर याचा सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केली. परंतु त्याचवेळी गुज्जर हा मेट्रोच्या सहाय्याने हैदराबाद येथून दिल्लीला गेला. यावेळी पोलिसांना हुलकावणी देत फरार होण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर देखील पोलिसांचे पथक त्याच्या पाळतीवर होते. याच दरम्यान गुजर हा दिल्लीवरुन पाकिस्तानला जाण्याच्या विचारात होता. त्या पध्दतीने तो राजस्थानातील अजमेर, माऊंट अबू, म्हैसाणा आणि गुजरातमधील अहमदाबाद आला व या मार्गे तो पाकिस्तानला जाण्याची लिंक लागते का याची विचारपूस केली. त्यानंतर भांडूप येथे त्याने काही सेकंदांसाठी सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकले. याच दरम्यान दरोडा प्रतिबंधक पथकाला त्याची खबर लागली. परंतु गुज्जरकडे पाकिस्तानला जाण्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो तेथून पुण्याला आला. त्यावेळी देखील पोलीस त्याच्या मागावर होते. पैसे घेण्यासाठी तो बीडला आल्याची खात्रीशीर माहिती दरोडा प्रतिबंधक व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचत मंगळवारी गुज्जर याला बीड शहरामधून अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, दोन राऊंड जप्त केले. त्याला शिवाजीनगर पोलिसांकडे स्वाधीन केले. गुज्जरला न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, उप अधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पो. नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, सपोनि संदीप साळवे, पो. क़ मनोज वाघ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, महेश भागवत, संतोष म्हेत्रे, शेख आसेफ, चालक नारायण साबळे यांनी केली.चार हजार किलोमीटर केला प्रवासशिक्षक खून प्रकरणातील काही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मास्टरमार्इंड गुज्जर खान याच्या पाळतीवर पोलिसांची पथके होती.यावेळी हैदराबाद, दिल्ली, गुजरात, राजस्थान अशा चार राज्यात चार दिवसात चार हजार किलोमीटरचा प्रवास दरोडा प्रतिबंधक पथकाने केला व गुज्जरला अटक केली.गुज्जर खानवर मोक्का अंतर्गत होणार कारवाईकाही महिन्यापूर्वी एका भंगारच्या व्यापाºयाला खंडणी मागितली होती. तसेच त्याच्या घरावर पेट्रोल टाकून हल्ला केला होता. याप्रकरणी बीड ग्रामीण व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुज्जर व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुज्जरवर विविध प्रकारचे २६ गुन्हे दाखल असून, त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील प्रस्तावित आहे.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडCrime Newsगुन्हेगारीArrestअटक