शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संचिका गहाळ प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना नोटीस

By शिरीष शिंदे | Updated: September 11, 2022 14:54 IST

बीड शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची जुनी संचिका गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत संचिका उपलब्ध झाली नाही तर कारवाईची तंबी दिली आहे.

- शिरीष शिंदे  बीड: शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची जुनी संचिका गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत संचिका उपलब्ध झाली नाही तर कारवाईची तंबी दिली आहे. मुख्य सहायक यु.पी. सानप व सेवा निवृत्त परिक्षक भूमापक एच.व्ही. तिवारी, परिक्षण भूमापक ए.एस. उजगरे अशी नोटीस बजावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरातील जुना मोंढ्याची संचिका मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे दोन वर्षांपूर्वी अर्ज केला होता. मात्र, त्यांना संचिका देण्यात आली नाही. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर संचिका गहाळ झाली असल्याची बाब समोर आली. या प्रकरणी त्यांच्याकडून सदरील संचिका मिळण्यासाठी नियमित प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, उपअधीक्षक भूमी अभिलेख माणिक मुंडे यांनी सानप व तिवारी यांना नोटीस बाजवली आहे. त्यात नुमूद केले आहे की, बीड शहरातील सर्व्हे नंबर १ व २ ची मोजणी सन २००७ मध्ये झाली होती. सदरील संचिकेची आज शोध घेतला असता ती आढळून येत नाही. आपली बदली झाली असता त्यावेळी ही संचिका आपण कोणाकडे हस्तांतरीत केली होती, ती हस्तांतरण यादी आठ दिवसात दाखल करावी किंवा त्या संचिकेचा शोध घेऊन सादर करावी. या संचिकेबाबत लेखी म्हणने सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यु.पी. सानप हे मुख्यालय सहायक म्हणून शिरुर येथे सध्या कार्यरत आहेत तर तत्कालीन परिक्षक तिवारी सेवा निवृत्त झाले आहेत. या पुर्वी ही बाजावल्या आहेत इतरांना नोटीसतत्कालीन परीक्षण भूमापक आर.आर. विभुते, तत्कालीन नगर भूमापन लिपिक व्ही.डी. मुळे व अभिलेखापाल व्ही.बी. सोनवणे यांना समज देऊन संचिकेचा शोध घेऊन ती सादर करण्याचे यापुर्वी आदेशित केले होते. ५ फेब्रुवारी २०२१ च्या लेखी खुलाशात सदरची संचिका अभिलेखात शोध घेतला असता आढळून येत नाही, असे उपअधीक्षक माणिक मुंडे यांनी जिल्हा अधीक्षकांना पत्रान्वये कळवले होते. त्या पत्रावर उत्तर देताना भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक दादासाहेब घोडके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करुन नियमानुसार गहाळ संचिका पुनर्गठीत करावी, असे आदेशित केले होते. आता पुन्हा याच प्रकरणी इतर तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Beedबीड