शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

गडावरून ‘राजकारण’ नाही - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:49 IST

मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायणगडावरील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

बीड : मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नारायणगडावरील विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाधिपती महंत शिवाजी महाराज, शिवस्मारक समिती, मुंबईचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे, माजीमंत्री सुरेश धस, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ.आर.टी. देशमुख, माजी आ. बदामराव पंडित, जि.प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, मंदिर विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सभापती संतोष हंगे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मेटे यांचे आभार मानले. निवडणुकीत ठरल्याप्रमाणे इतर घटक पक्षांना मंत्रीपद मिळाले, परंतु आ. विनायक मेटे यांनाही मंत्रीपद द्यावे, अशी विनंती केली होती.मुख्यमंत्र्यांचे सहकार्य : विकास करणारपंकजा मुंडे म्हणाल्या, हा जिल्हा गडांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या गडांना मानणारा वारकरी संप्रदायही मोठा आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गडांवर येणा-या भाविकांची संख्याही मोठी असते. या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने निधी उपलब्ध करुन दिला असून, यातून विविध विकास योजना पूर्ण केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे-जे प्रस्ताव मी घेऊन गेले त्यास त्यांनी मंजुरी दिली, असे यावेळी सांगितले.