शाळा सुरू होण्याआधी व सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा घोळका, पालकांची गर्दी यामुळे सोशल डिस्टन्स व कोरोनाबाबतच्या दक्षतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. अशावेळी शिक्षकही सूचना करत बेजार होतात.
------
विद्यार्थी अल्लड असले तरी कोरोनाबाबत दक्ष आहेत. आम्ही केलेल्या सूचनांचे ते पालन करतात. विनामास्क विद्यार्थी आल्यास त्याला यूज ॲन्ड थ्रोचे मास्क देतो. - आनंद नवले, शिक्षक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड.
--------
सध्या विद्यार्थी संख्या कमी असल्याने फारशा सूचना द्याव्या लागत नाहीत. तापमान, ऑक्सिजन तपासतो. काही मुले मास्कचा कंटाळा करतात, त्यांना दप्तरातून मास्क काढायला लावतो, यात वेळ जातो, हे मात्र खरे- विजय जामकर, शिक्षक, जि. प. मा. शाळा, पिंपळनेर.
-------
शासनाच्या नियमानुसार आम्ही सूचना करतो. दमछाक होत नाही. वर्गखोली, बैठक व्यवस्थेचे नियोजन केलेले असल्याने सुरळीतपणा आला आहे. - सुनील सोनवळकर, संस्कार विद्यालय, बीड.