शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींची नोंद बीड नगर परिषदेकडे नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:59 IST

बीड शहरातील पेठबीड भागात जुन्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, बीड शहरातील धोकादायक इमारतींची बीड पालिकेकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देगाफीलपणा: नगररचना, बांधकाम, स्वच्छता विभागाची टोलवाटोलवी; अपघाताची भीती

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरातील पेठबीड भागात जुन्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, बीड शहरातील धोकादायक इमारतींची बीड पालिकेकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गंभीर असतानाही पालिका याबाबत अनभिज्ञच आहे. विशेष म्हणजे नगर रचना विभाग, बांधकाम व स्वच्छता विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवित हात झटकत आहेत.बीड शहरात जुन्या लोकांनी बांधलेली माळवद, विटा मातीची घरे आजही अनेक ठिकाणी आहेत. मोठा पाऊस झाला किंवा वादळ वारे सुटले तर या इमारतींना अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. या इमारती पाडण्याची गरज आहे. परंतु बीड पालिकेला बीड शहरात किती इमारती धोकादायक आहेत, याचीच माहिती नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.भीती!बीड शहरात सर्वत्र टोलेजंग इमारती अनधिकृतपणे उभारल्या जात आहेत. याकडेही बीड पालिका ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. या इमारतींवर कारवाई करण्यास आखडता हात घेतल्याचे वारंवार समोर आल्याने कामाकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.एकमेकांकडे दाखविले बोटधोकादायक इमारतींच्या माहितीसाठी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपण बाहेर असल्याचे सांगून अभियंत्यांकडून माहिती घेण्यास सांगितले. बांधकाम अभियंता रेवनवार यांनी स्वच्छता विभागाकडे बोट दाखविले. स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी तिडके यांनी नगर रचना विभागाचे नाव सांगितले. नगर रचना विभागात विचारणा केल्यावर त्यांनी पुन्हा स्वच्छतेकडे बोट दाखविले.

टॅग्स :Beedबीड