शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची खातेफोड होऊन वेगळे झाले तरी मिळणार नाही लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:40 IST

केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान योजना : प्रत्यक्ष दोन हेक्टर शेती असणाऱ्यांनाच लाभ; २० फेब्रुवारीपर्यंत माहिती अपलोड करण्याच्या सूचना

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता. या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, या योजनेचा लाभ देण्यासाठी शेतीची खातेफोड झालेली असेल तरीदेखील संपूर्ण कुटुंब गृहित धरले जाणार असल्यामुळे अनेक शेतकºयांना या योजनेपासून वंचित राहवे लागणार आहे. सर्व कागदपत्रे देऊन देखील लाभ मिळणार नसल्यामुळे शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.बीड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ५१ हजार ७८३ शेतकरी संख्या आहे. त्यापैकी जवळपास ५.५० लाख अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन ते अडीच लाख जणांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत युद्धपातळीवर काम करुन पात्र अल्पभूधारक शेतकºयांची माहिती पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना पत्राद्वारे कृषी सचिवांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे रविवार व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या शासकीय सुटीच्या दिवशी देखील संबंधित अधिकारी कर्मचाºयांना काम करावे लागणार आहे.पीएम-किसान योजनेच्या माध्यमातून दिलेल्या तारखेच्या आत अल्पभूधारक शेतकºयांची माहिती अपलोड करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व इतर काही कर्मचाºयांना या योजनेच्या कामात सहभागी करुन घेतले आहे. अल्पभूधारक शेतकºयांची नावे सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर एकाच कुटुंबातील नावांचे वर्गीकरण होणार आहे. त्यानंतर त्या कुटुंबाचे शेतीचे क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त होत असेल तर या योजनेचा लाभ त्या कुटुंबाला मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांची संख्या जरी ५.५० लाख असली तरीदेखील लाभ मात्र फक्त दोन ते अडीच लाख शेतकºयांना होणार आहे. त्यामुळे शेतकºयांमधून योजनेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.विभक्त कुटुंब पद्धती.... अनेक शेतकरी कुटुंब हे विभक्त झालेले आहेत, त्यांनी शेतजमिनीची खातेफोड करुन प्रत्येकजण वैयक्तिक शेतीची वहिती करत आहेत. मात्र, तरी देखील या योजनेसाठी खातेफोड झालेले असताना कुटुंबाची एकत्रित शेती ही दोन हेक्टरपेक्षा अधिक दिसत असल्यामुळे पात्र असून देखील लाभ मिळणार नाही, त्यामुळे ज्या शेतकºयांच्या नावे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र आहे त्यांना सरसकट योजना लागू करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.२४ फेब्रुवारीला योजनेचा शुभारंभ ... योजनेचा शुभारंभ येत्या २४ तारखेपासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २० फेब्रुवारी पर्यंत सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्यात येणार आहे. शासकीय सुटी रद्द करुन संबंधीत अधिकारी,कर्मचाºयांनी कार्यालयात हजर राहून माहिती अपलोड करण्याच्या वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र