शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 16:35 IST

वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला साहित्याचा पुरवठा करण्यात न आल्याचे व शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित असल्याचे पंचनाम्यात सांगितले आहे.

धारूर - धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालय सुरू होऊन ही या कार्यालयात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण न झाल्याच्या तक्रारी वरून तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी या कार्यालयाचा पंचनामा केला. वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला साहित्याचा पुरवठा करण्यात न आल्याचे व शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित असल्याचे पंचनाम्यात सांगितले आहे.

धारूर येथे ऑगस्ट 2020 मध्ये सामाजिक वनीकरणचे कार्यालय सुरू झाले हे कार्यालयात वनक्षेञ अधिकारी व वनरक्षक ही दोन पदे आहेत. हे कार्यालय प्रजासत्ताक दिनी चांगलेच चर्चेत आले. या दिवशी या कार्यालयात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण झाले नसल्याची तक्रार तहसीलदारांकडे गेली. तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी तात्काळ मंडळ अधिकारी नजिर खुरेशी यांना या कार्यालयाचा पंचनामा करण्यास पाठवले त्यांनी आडस रोडवर भाड्याचे जागेत असणारे ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्यांनी पंचनामा केला असता या कार्यालयात वनक्षेञ अधिकारी जे आर भांगे हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी वरीष्ठ कार्यालयाकडून आपणास कुठलेच साहित्य पुरवले नसल्याचे सांगितले शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित होतो असे पंचनाम्यात सांगितले असल्याचे मंडळ अधिकारी नजिर खुरेशी यांनी सांगितले.

पंचनामाचा अहवाल तहसील कार्यलयात देऊन पुढील कारवाई वरिष्ठाचे आदेशानुसार केली जाईल असे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगितले. या कार्यालयावर ध्वजारोहण न केल्याबद्दल काय कारवाई होणार?, यासाठी दोषी कोण?, ऑगस्ट 2020 ला कार्यालय झाले म्हटल्यावर भारतीय स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाले का? असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. या विषयाची शहरात चर्चा सुरू होती.  

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनBeedबीड