बीड : जिल्ह्यात शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सुदैवाने कोरोनाच्या एकाही मृत्युची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील ७९६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ७६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून केवळ २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ३५ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आले आहे. शिवाय नव्याने निष्पन्न होणाऱ्या रुग्ण संख्येतही घट झाली आहे. शुक्रवारी २८ नवे रुग्ण निष्पन्न झाले. बाधितांमध्ये अंबाजोगाई २, आष्टी १२, बीड १०, केज १, माजलगाव २ व वडवणी तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १६ हजार ५९५ इतका झाला आहे. पैकी १५ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाले असून ५२६ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.