शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी संबंध नाहीच; अंबाजोगाईत यकृतने तर गेवराईच्या व्यक्तीचा फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 16:42 IST

कोरोना संशयित असल्याने दोघांचेही शवविच्छेदन झाले नाही. 

बीड : कोरोना संशयित असलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. स्वॅब घेतले असता ते निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोनाशी संबंध नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. अंबाजोगाईतील कामगाराचा यकृतने तर गेवराईच्याला फुफ्फुसाचा आजार असल्याचे सांगण्यात आले. कोरोना संशयित असल्याने दोघांचेही शवविच्छेदन झाले नाही. 

गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील ३८ वर्षीय व्यक्ती औरंगाबादहून आल्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे दिसली होती. तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. स्वॅबही पाठविला. तो निगेटिव्हही आला. परंतु अचानक प्रकृती खालावून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा स्वॅब घेऊन पुण्याला पाठविला. तो देखील निगेटिव्ह आला. त्याचा मृत्यू हा कोरोनामुळे नव्हे तर त्याला अस्थमा, फुफ्फुसाचा आजार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर आगोदरच उपचार सुरू होते. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.

अंबाजोगाईतही ओरीसा राज्यातून आलेल्या कामगाराचा आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू झाला होता. त्याचा स्वॅब घेतल्यानंतर अहवालही निगेटिव्ह आला होता. त्यामुळे हा मृत्यूही कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला यकृतचा आजार होता. त्यामुळे त्याची अचानक प्रकृती खालावली आणि मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरू नये; आवाहन बीडमध्ये कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याने नागरिक घाबरले होते. परंतु दोघांचाही कोरोनाशी कसलाच संबंध नाही. दोघांचेही स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, धीर धरावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले जात आहे.

कोरोना स्वॅब निगेटिव्ह आले आहेतदोघा मयतांचे कोरोना स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोनाशी संबंध नाही. गेवराईतील व्यक्तीला फुफ्फुसाचा आणि अंबाजोगाईतील कामगाराला यकृतचा आजार होता. त्यांच्यावर आगोदरच उपचार सुरू होते. दोघेही कोरोना संशयित असल्याने शवविच्छेदन केले नाही.- डॉ.अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड