शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वय वाढवून ठाण मांडलेल्या ‘त्या’ संचालकांसह ९० अधिकाऱ्यांना डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 05:45 IST

राजकारण्यांच्या आशीर्वादाने निवृत्तीचे वय केले होते ६२

- सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क   बीड : राजकारण्यांना हाताशी धरून सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ केलेल्या ९० अधिकाऱ्यांना आता ३१ मे रोजी डच्चू दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि शासनाच्या नव्या नियमानुसार ६० वर्षांवरील प्रत्येक अधिकारी घरी जाणार आहे. यात संचालक, अपर संचालक, सहसंचालक, उपसंचालक अशा महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

आरोग्य विभागात सेवानिवृत्तीचे वय हे ५८ वर्षे आहे. परंतु, काही बड्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून २०१५ मध्ये हे वय ५८ वरून ६० केले. नंतर २०१९ मध्ये ६० चे ६२ केले. नंतर २०२१ मध्ये ६२ वर्षांचा हा निर्णय कायम राहिला. यामुळे पदोन्नतीस पात्र असतानाही इतर अधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. बीडच्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या वयवाढीला विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात न्यायालयानेही हे चुकीचे असल्याचे सांगितले. मॅटनेही यावर असाच निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानेही पाच महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत रिक्त पदांबाबत शासनाचे कान टोचले होते. परंतु, तरीही सचिवांसह इतर अधिकाऱ्यांनी याची तत्काळ अंमलबजावणी केली नाही. पुन्हा एक नियम बनवून ५८ वर्षांवरील अधिकाऱ्यांना अभय दिले होते.

‘लोकमत’ने उठविला आवाजवय वाढवून ठाण मांडलेल्या ठराविक अधिकाऱ्यांमुळे राज्यातील शेकडो अधिकाऱ्यांना पात्र असतानाही पदोन्नती मिळत नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानेच ठाण मांडलेले अधिकारी घरी जाणार आहेत. त्यामुळे डॉक्टरांमधून ‘लोकमत’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.   

२०२३ पासून ५८ वर्षांची अंमलबजावणी३१ मे २०२२ रोजी ६० वर्षांवरील सर्व अधिकारी निवृत्त होतील. तसेच ५८ वर्षांवरील अधिकारी हे ३१ मे २०२३ ला निवृत्त होतील. जून २०२३ पासून निवृत्तीचे वय हे ५८ ठेवण्याचा नियम शासनाने केला आहे. परंतु, हा केवळ अधिकाऱ्यांसाठीच का, इतर कर्मचाऱ्यांना का नाही? असा सवाल केला जात आहे.  

३१ मे रोजी जवळपास ९० अधिकारी निवृत्त होतील. त्यांच्या जागेवर कोणाला नियुक्त करायचे, हे शासन ठरवेल. -डॉ. साधना तायडे, संचालक आरोग्य सेवा, मुंबई