शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:27 IST

बांधकाम क्षेत्रातील फिरलेली रक्कम १० हजार रूपयाची देत नसल्यामुळे नऊ जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी गुरूवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात परळीतील नऊ जणांना सात वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रूपयांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधिक क्र .१ चे न्या.अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बांधकाम क्षेत्रातील फिरलेली रक्कम १० हजार रूपयाची देत नसल्यामुळे नऊ जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी गुरूवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात परळीतील नऊ जणांना सात वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रूपयांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधिक क्र .१ चे न्या.अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला.परळीतील बाबासाहेब गायकवाड व जावेदखान पठाण या दोघांची मैत्री होती. या दोघांनी औष्णिक विद्युत केंद्रात बांधकामाची कंत्राटी घेण्याची कामे चालत होती. कंत्राटी कामातील बाबासाहेब गायकवाड यांच्याकडे १० हजार रूपये हिशोबातील फिरले होते. सदरील रक्कम जावेदखाँ पठाण वारंवार मागणी करत होते. मात्र सदरील रक्कम वसूल होत नसल्यामुळे १८ जून २०१७ रोजी परळी शहरातील एन.के. शोरूममध्ये जावेदखा पठाण यांनी बाबासाहेब गायकवाड यांना बोलावून पैशाची मागणी केली. या मध्ये त्यांची बाचाबाची झाली. तेथून आरोपी निघून जात इतर गैरकायद्याची मंडळी जमवून जावेदखाँ पठाण, सय्यद सारेख समद, शेख जुबेर शेख शब्बीर, शेख निजाम शेख बाबू, समद अमजद सिद्दिकी, सय्यद तौफिक सय्यद खुरखान, मुजहीर इस्माईल खान पठाण, आयाज शहराज खान, बबलू उर्स समर लतीब खा पठाण यांनी तलवार व काठ्याने फिर्यादी बाबासाहेब गायकवाड यांच्या डोक्यात व हातावर वार केले. सदरील हल्ल्यात बाबासाहेब गायकवाड यांना परळीच्या ग्रामीण रूग्णालयात नेले. परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे स्वाराती रूग्णालयात दाखल केले. नंतर गायकवाड यांना स्वाराती रूग्णालयाने देखील लातूरच्या खासगी रूग्णालयात हालविण्याच्या सूचना दिल्या. लातूर येथे शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचविण्यात यश आले होते. या प्रकरणी बाबासाहेब गायकवाड यांच्या फिर्यादीवरून परळी शहर ठाण्यात नऊ जणांविरूद्ध खुनी हल्ला, अनुसूची जाती-जमाती कायदा व गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी तपास करून दोषारोप पत्र अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पक्षाची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने वरील सर्व आरोपींना खुनी हल्ला प्रकरणी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंड व दंड न भल्यास सहा महिने सक्त मजुरी तर कलम १४८ अन्वये दोन वर्ष शिक्षा व पाचशे रूपयांचा दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी ठोठावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगवण्याच्या असून अनुसूचित जाती व जमाती कायद्यामधून वरील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड.अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले तर आरोपीच्या शिक्षेबद्दल सहा. सरकार आर.एम.ढेले यांनी युक्तीवाद केला. सरकार पक्षास अ‍ॅड. डी.व्ही. चौधरी, अ‍ॅड. डी.आर.गोरे यांनी सहकार्य केले.सरकार पक्षातर्फे तपासले ११ साक्षीदारया प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पक्षाची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने वरील सर्व आरोपींना हल्लाप्रकरणी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयOrder orderआदेश केणे