शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीसाठी माहेरी जाण्यास मज्जाव केल्याने नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 20:05 IST

विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.

ठळक मुद्दे१५ जानेवारी रोजी संक्रात सण हुंड्याच्या पैशासाठी सासरच्या मंडळीकडून छळ

बीड : हुंड्याचे पैसे आणण्यासाठी तगादा आणि त्यातच संक्रांत या सणासाठी माहेरी जाण्यास मज्जाव केल्याने कंटाळून पूजा विकास बिक्कड (२४) या विवाहितेने गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली. ही घटना शहरातील धानोरा रोडवरील महात्मा फुलेनगरात घडली. विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.

पूजा हिचा हिचा हुंड्याच्या पैशासाठी सासरच्या मंडळीकडून छळ केला जात होता. तसेच १५ जानेवारी रोजी संक्रात सण असल्याने पूजा हिने  माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, नवरा विकास याने जाण्यास नकार दिला. हुंड्यासाठी छळ आणि माहेरी न जाऊ दिल्यामुळे पूजा हिने रविवारी राहत्या घरी गळफास घेतला. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पूजाचे वडिल राजेंद्र केंद्रे (रा. सारूकडवाडी, ता.केज) यांच्या फिर्यादीवरून  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती विकास, सासू लक्ष्मी बिक्कड व नणंद विद्या बिक्कड या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. मीना तुपे या करीत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिलाBeedबीड