शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बीड न.प.मध्ये नवीन घंटागाड्या दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बीड नगर पालिकेने सहभाग घेतला आहे, यासाठी स्वच्छता अभियान, घनकचरा प्रकल्प ...

ठळक मुद्देशहर कचरा मुक्त करण्याचा संकल्पनगराध्यक्षांच्या हस्ते झाले लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बीड नगर पालिकेने सहभाग घेतला आहे, यासाठी स्वच्छता अभियान, घनकचरा प्रकल्प यासह जनजागृती करून संपूर्ण बीड शहर कचरा मुक्त करण्याचा संकल्प न.प.ने हाती घेतला. ३० आॅक्टोबर रोजी ओला व सुका कचरा संकलनासाठी नवीन ६ घंटागाड्या न.प.मध्ये दाखल झाल्या. त्याचे लोकार्पण नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.बीड शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी डिपीआरच्या माध्यमातून ६ नवीन घंटा गाडी (वाहने) खरेदी करण्यात आले आहेत. मंगळवारी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या शुभहस्ते त्याचा लोकार्पण करु न ती वाहने बीडकरांच्या सेवेत दाखल करण्यात आली. यावेळी सभापती मुखीद लाला, नाजू बागवान, साजेद जहागीरदार, विशाल मोरे, रवी शेरकर, वैजिनाथ शिंदे व स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या घंटा गाड्यांमुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यास मदत होणार असुन शहरातील प्रत्येक वार्डात ही वाहने जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचतही या माध्यमातून होणार आहे. भविष्यात अजून १० घंटागाड्या शहरातील नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. शहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा जमा करण्यास त्यांना मदत करावी, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान