शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपात बीड जिल्ह्यातील बँकांचा हलगर्जीपणा; २१४२ कोटींचे उद्दिष्टे असताना केवळ ६१.३४ कोटींचेच केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:49 IST

शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

बीड : खरीप हंगाम पेरणी, लागवडीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र पीक कर्जाविना शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे. कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्याचे दाखले शासन नेहमीच देत असते. मात्र, शासनाच्या कर्जवाटप योजनेस जिल्ह्यातील सर्व बँकांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रूपयांचे खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यामध्ये बँकांनी कर्ज वाटप न केल्यामुळे खरीप लागवडीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे बँकांविरोधात तक्रारी करू लागले आहेत.

बीड जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी अनुकूल आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांशी बैठकीच्या माध्यमातून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश देत आहेत. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली दाखवली गेल्याने जिल्हा प्रशासन देखील बँकांपुढे हतबल झाले आहे.  ज्या बँका पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

बँकांचे अधिकारी आरबीआयच्या परिपत्रकाची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वैधानिक अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे. बँकांची मुजोरी अशीच सुरु राहिली तरी जिल्हाभर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.

१८ बँकामार्फत केले जाणार कर्जवाटपजिल्ह्यातील प्रमुख १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, त्यापैकी फक्त ६१ कोटी रूपये बँकांनी वाटप केले आहे.शेतकरी हवालदिल खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्जासाठी सामान्य शेतकऱ्यांना बँकांचे खेटे घालावे लागत आहेत. मात्र, बँकाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे

कर्जवाटपाच्या संदर्भात दिलेल्या आदेशाला बँकांच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे येत्या १८ तारखेला बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.- एम. डी. सिंहजिल्हाधिकारी, बीड

 

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडFarmerशेतकरीbankबँक