शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा कात टाकणार; केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 14:02 IST

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे.

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : चालुक्य काळात बांधण्यात आलेल्या मंदिराची पुरातत्व विभागाकडून शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या मंदिराचे पुनर्निर्माणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असुन येत्या दोन वर्षात हे मंदिर पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. 

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे. या वास्तू शिल्पाचे जतन व्हावे यासाठी गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून यावर आवाज उठवला होता. त्यानुसार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, सेवानिवृत्त असलेले जतन समितीचे बालाजी बनसोडे, अभियंता नितीन चारुडे, वास्तू विशारद योगेश कासार आणि आकाश कराड यांनी या ठिकाणी पाहणी केली. या वास्तू शिल्पाचे पुनर्निर्माण करण्याचे ठरवत प्रत्यक्ष कामास सुरवात केली. येत्या दोन वर्षात या स्थापत्य शिल्पास गत वैभव मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.

सदरील स्थापत्य शैलीत विविध प्रकारची शिल्पे कोरलेली असून तिचे संवर्धन होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. या कामात लोकसहभाग लाभल्यास लवकरात लवकर या वस्तूला गत वैभव प्राप्त होऊ शकते. दोन अडीच वर्षापुर्वी बारव संवर्धन समितीचे सदस्य, साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांनी या मंदिरास भेट दिल्यानंतर  येथील माजी सरपंच विलास साळवे यांच्यासोबत चर्चा केली होती. यापुर्वी काही परदेशी अभ्यासक ही निरिक्षण करुन गेले. मागील महिन्यात डॉ. संजय बोरूडे यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. या सर्व कामात कवी प्रभाकर साळेगावकर यांचा महत्वाचा वाटा आहे. जावेद देशमुख यांचेही सहकार्य लाभलेले आहे.

असे होणार कामपुरातत्व विभागाच्या माध्यमातून या वास्तू शिल्पाची पाहणी करून  या करावे लागेल, याचा अंदाज आराखडा काढण्यात आला. ड्रोनद्वारे वस्तुस्थितीचे छायांकन करून समिती काही दिवसांतच आवश्यक सुधारणा लवकर करणार आहे.      ३ कोटींचा खर्च अपेक्षित वास्तू शिल्पाची पाहणी झाली असून कामाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.  लवकरच त्याचे काम देखील सुरू करण्यात येणार आहे.मंदिर उभारण्यासाठी अंदाजित 3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.- अमोल गोटे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग,छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणBeedबीड