शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा हलगर्जी; प्रकृती गंभीर असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविलेल्या वृद्धाचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:19 IST

आठवड्यापूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एकाचा जीव गेल्याची तक्रार समोर आली होती. याप्रकाराने तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

ठळक मुद्दे७२ वर्षीय वृद्धास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ८ ऑगस्टला आरोग्य केंद्रात दाखवले रेफर लेटरवर स्पष्ट लिहिलेले असतानाही डॉक्टरांनी तपासणी न करताच त्याला घरी पाठविले.

बीड : एका वृद्धाला आॅक्सिजनची आवश्यकता असताना आणि प्रकृती चिंताजनक असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविले. त्यानंतर अवघ्या काही तासांनी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला. ही घटना पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे रविवारी घडली. या निमित्ताने जिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आठवड्यापूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एकाचा जीव गेल्याची तक्रार समोर आली होती. याप्रकाराने तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

डोंगरकिन्हीपासून जवळच असलेल्या एका वस्तीवरील ७२ वर्षीय वृद्धास  श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ८ आॅगस्ट रोजी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता आॅक्सिजन अवघा ४५ (किमान ९० पाहिजे) होता. तसेच त्याला कोरोनाची लक्षणे असल्याने रेफर लेटरवर स्पष्ट लिहून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले. सायंकाळच्या सुमारास त्या वृद्धाचा स्वॅब घेऊन त्याला घरी पाठविण्यात आले. रेफर लेटरवर स्पष्ट लिहिलेले असतानाही डॉक्टरांनी तपासणी न करताच त्याला घरी पाठविले. त्याला घरी पाठविले म्हणून नातेवाईकांनीही डोंगरकिन्हीच्या डॉक्टरांना कळविले नाही. रविवारी सायंकाळी त्याला पुन्हा त्रास सुरू झाला आणि रात्रीच्या सुमारास त्याचा घरीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

चौकशी करून दोषींवर कारवाई करावीया प्रकरणात कोणत्या डॉक्टरची चूक आहे, हे प्रशासनाने ठरवावे. परंतु रुग्ण गंभीर असतानाही त्याला घरी पाठविले. त्यामुळे तो दगावला. यात आरोग्य विभागाची चूक आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

रुग्णवाहिका नसल्याने खाजगी वाहनडोंगरकिन्ही आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रुग्णाला हलवण्यास स्वतंत्र रुग्णवाहिका नाही. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या रुग्णाला खाजगी वाहनातून बीडला आणले. रुग्णवाहिका संख्या वाढविण्याची गरज आहे.

आरोग्य केंद्रात आल्यावर त्याची तपासणी करून रेफर केले. जिल्हा रुग्णालयातून स्वॅब घेऊन त्याला घरी पाठविले. रविवारी त्याचा मृत्यू झाल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्व प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना बोललो आहे.    - डॉ.एल.आर.तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा 

रुग्ण कधी आला व कोणी तपासला, त्याला घरी का पाठविले, याबाबत सर्व माहिती घेऊन तुम्हाला कळवितो.- डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड