बीड : जिल्ह्यात व शहरात दोन-तीन दिवसांपासून थंडीचे वातावरण हळूहळू कमी होऊन तापमान वाढल्याने उष्णता वाढू लागली आहे. यामुळे गरमी वाढू लागली आहे. यामुळे शहरात पाणपोयांची आवश्यकता भासू लागली आहे. कोरोनामुळे पाणपोयी सुरू कराव्यात की नाही, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.
भाजी दरात घसरण
अंबाजोगाई : ग्रामीण भागातून भाज्यांची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाली. टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, फळभाज्यांचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
अंतर्गत रस्तेेे खराब
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता, मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. अनेक गावांमध्ये नाल्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने वाहतूक कोंडी होते.