दिवसा वीज पुरविण्याची मागणी
बीड : रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहेत.
अशुद्ध पाणीपुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र पाईपलाईन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी आहे.
स्वच्छतागृह अस्वच्छ
बीड : शहरात नगरपालिकेकडून स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र स्वच्छता न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.