शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सोशल डिस्टन्सिंगसह जमावबंदीचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:59 IST

तालुक्यातील सादोळा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वाटपानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची भाजप तालुका अध्यक्षांकडून मागणीसत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनासमोर आव्हान

माजलगाव : तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळुंकेकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या जमावबंदीसह सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  याबाबत भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी पीककर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम राजकीय धुंदीत केल्याचा आरोप करत बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील सादोळा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वाटपानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीयीकृत बँकेचे शाखाधिकारी संदीप कुमार व फिल्ड ऑफिसर बालाजी यांना बोलवण्यात आले. महामारीचे भयंकर संकट घोंगावत असताना आ.प्रकाश सोळंके यांनी यावेळी कर्ज वाटपाच्या निमित्त मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. या वाढलेल्या गर्दीमुळे राज्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे तीन-तेरा झाले तर सोशल डिस्टिंगचा ही फज्जा उडाला.

याबाबत भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी, पीककर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार प्रकाश सोळुंके यांनी राजकीय धुंदीत केला असून यामुळे तालुक्यात कोरोना महामारीचा धोका वाढला असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास भारतीय जनता पार्टीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर गर्दी जमवून मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनासमोर आव्हान

सर्वसामान्यांना नियमांच्या कचाट्यात अडकून आतापर्यंत माजलगाव शहरात अनेकांवर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर गर्दीच्या कारणामुळे गुरूवार दि.11 रोजी शहरातील पाच व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नियमाची पायमल्ली करणाऱ्या एका डॉक्टरसह 15 लोकांवर मागे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी नियमांचे मोजमाप करणाऱ्या प्रशासनासमोर या घटनेतून सत्ताधारी आमदारावर गुन्हे दाखल करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या