शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा भाजपला दणका ! माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजुर यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 17:43 IST

भाजपच्या रेश्मा दीपक मेंडके यांनी  बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारे संख्याबळ दिसून येत नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला.

ठळक मुद्दे सहाल चाऊस यांना बडतर्फ केल्याने झाली होती निवडणुक

माजलगाव : येथील नगरपालीकेचे नगराध्यक्ष तीन महिने गैरहजर राहिल्याने त्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर या पदासाठी निवडणुक प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे केवळ राष्ट्वादीचे शेख मंजुर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज राहिला. यामुळे त्यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली असून आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे. 

चार वर्षापूर्वी माजलगाव नगर पालीकेची निवडणुक झाली होती. यावेळी नगराध्यक्ष  निवडणुक ही जनतेमधून होऊन भाजपा आघाडीचे सहाल चाऊस हे विजयी झाले होते. पालिकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चाऊस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. या दरम्यान ते सतत तीन महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याची तक्रार उपनगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षपद रिक्त केले. त्यानंतर मागील तीन महिन्यापासून या रिक्त पदाचा पदभार हा सुमनबाई मुंडे यांच्याकडे होता. 

दरम्यान, अध्यक्ष पदासाठी शासनाच्या नवीन नियमानुसार नगरसेवकांमधून अध्यक्ष करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानंतर अनेक राजकीय घडामोडी मागील काही दिवसात पहावयास मिळाल्या. अध्यक्षपदासाठी भाजपाकडून रेश्मा दीपक मेंडके यांनी तर राष्ट्रवादीकडून शेख मंजूर यांनी उमेदवारी अर्ज भरले. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या रेश्मा दीपक मेंडके यांनी  बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारे संख्याबळ दिसून येत नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 

न्यायालयीन प्रकरणांच्या निकालाची प्रतीक्षा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगाने तीन याचिका उच्च न्यायालयात दाखल असून यात बडतर्फी विरोधातील चाऊस यांची एक , शेख मंजूर यांच्या जात प्रमानपत्राबाबत दुसरी आणि एका नागरिकांच्या वतीने अध्यक्ष जनतेतूनच व्हावा म्हणून केलेली तिसरी यांचा समावेश असून यात न्यायालय काय निकाल देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे यामुळे शेख मंजूर हे बिनविरोध अध्यक्ष झाले असले तरी पदावर न्यायालयांच्या निकालाची टांगती तलवार कायम आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड