शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई, केज, नेकनूर भागात नमिता मुंदडा यांच्या कॉर्नर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:51 IST

केज विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरणात पूर्णत: तापले आहे. भाजपच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेण्यात येत असून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले.

ठळक मुद्देमला आशीर्वाद द्या : मतदारांशी संपर्क करीत केले आवाहन

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरणात पूर्णत: तापले आहे. भाजपच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेण्यात येत असून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले.भाजपा - शिवसेना - रासप -रयतक्रांती - रिपाइं महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई, केज व नेकनूर परिसरातील गावांमध्ये नमिता मुंदडा व समर्थक नेत्यांनी भेटी देत आशीर्वाद देण्याचे मतदारांना आवाहन केले.केज विधानसभा मतदारसंघात सत्ता नसतानाही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा नेहमी मतदारांच्या संपर्कात राहिले आहेत. त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. नंदकिशोर मुंदडा हे दिवसांतून १४ ते १६ तास जनतेच्या सेवेत असतात, असे दिनेश भराडिया यांनी सांगितले. गेल्या सात वर्षात सत्ता नसतांनाही सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांचे विविध माध्यमातून कार्य सुरूच आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन नगरसेवक संतोष शिनगारे यांनी यावेळी केले. कै. डॉ. विमल मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघ हे कुटुंब मानून मतदार संघाला न्याय दिला. त्याच धर्तीवर आजही नमिता मुंदडा जनसामान्यांसाठी कार्यरत आहेत. या कुटुंबाने समाजसेवेचा घेतलेला वसा पुढे चालविण्याचा निर्धार केला असून त्यांना साथ देण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे यांनी केले.विविध विकास कामांचा फायदा होतोय...कै. गोपीनाथराव मुंडे व डॉ. विमल मुंदडा, यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे झाली. मुंडे यांचा राजकीय वारसा जपत पालकमंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यात विकासाच्या माध्यमातून मोठा कायापालट केला. विविध विकासाच्या योजना जिल्हाभर राबविल्या. याचा मोठा फायदा प्रचार यंत्रणेत भाजपाला होत असल्याचे संतोष लोमटे म्हणाले. तसेच सलग २५ वर्षे विमल मुंदडा यांनी मतदार संघावर एकतर्फी अधिराज्य गाजविले. या मतदारसंघाचा विकासात्मक परिवर्तनाच्या त्या शिलेदार ठरल्या. मतदारसंघाला त्यांचा लाभलेला वारसा आगामी काळात नमिता मुंदडा जोपासतील, अशी खूणगाठ मतदारांनी बांधल्याचे सभापती मधुकर काचगुंडे, नगरसेविका उज्वला पाथरकर म्हणाल्या. भाजपाची मोठी ताकद नमिता मुंदडा यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल्याने त्यांच्यासाठी विजयपथ दूर राहिला नसल्याचे नगरसेवक सारंग पुजारी म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा