शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिरापूरमध्ये ‘मुन्नाभाई’ जेरबंद; फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:13 IST

बीड : स्वत:जवळ एम.बी.बी.एस.ची पदवी नसताना बेकायदेशीररित्या गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे रुग्णांवर अ‍ॅलोपॅथीचे औषधी उपचार करणाऱ्या भोंदू डॉक्टराला अतिरिक्त ...

ठळक मुद्देपदवी नसताना बेकायदेशीररित्या करत होता औषधोपचार

बीड : स्वत:जवळ एम.बी.बी.एस.ची पदवी नसताना बेकायदेशीररित्या गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे रुग्णांवर अ‍ॅलोपॅथीचे औषधी उपचार करणाऱ्या भोंदू डॉक्टराला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदरील मुन्नाभाईवर गेवराई पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.चंद्रशेखर माधवराव गवळी (वय ६०, रा. गढी, ता.गेवराई) असे त्या भोंदू डॉक्टरचे नाव आहे. वैद्यकीय सनद नसतानाही चंद्रशेखर गवळी हा गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे मुख्य रस्त्यावरील एका गाळ्यात बेकायदेशीररित्या रुग्णांवर अ‍ॅलोपॅथीचे औषधोपचार करत असल्याची गुप्त माहिती डॉ. संजय कदम यांना मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर डॉ. कदम यांनी मंगळवारी दुपारी १.३० वाजता नायब तहसीलदार जाधवर, डॉ. नेमाणी, तालुका आरोग्य पर्यवेक्षक ए.बी. पंडित, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण लोकरे, पोलीस कर्मचारी चव्हाण यांच्यासह हिरापूर येथे जाऊन माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी गवळी हा भोंदू डॉक्टर पलक शरिफ शेख आणि कृष्णाबाई तुकाराम ढाकणे या रुग्णांवर अनधिकृतपणे अ‍ॅलोपॅथीचे उपचार करताना आढळून आला. डॉ. कदम यांनी अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे गवळीकडे बी.ई.एम.एस.ची सनद असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, या सनदेवर अ‍ॅलोपॅथीचे उपचार करता येत नाहीत. डॉ. कदम यांच्या पथकाने घटनास्थळाहून विविध कंपन्यांची औषधी, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या आणि गोळ्या जप्त केल्या. याप्रकरणी मादळमोहीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण लोकरे यांच्या फिर्यादीवरून गवळी याच्यावर गेवराई पोलिसात मेडीकल प्रोटेक्शन अ‍ॅक्ट अन्वये आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी