उघडी रोहित्रे धोकादायक
धारुर : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या रोहित्रांचे दरवाजे गायब आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्यामुळे पाण्यात वीज प्रवाह उतरून धोका होऊ शकतो. त्यामुळे हे वीज रोहित्र दुरुस्तीची मागणी होत आहे.
बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी
वडवणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बिनव्याजी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये तत्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणीही होत आहे.
सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
वडवणी : शहरातील बाजार तळावर उभारलेले सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याने उघड्यावर व्यावसायिक व्यापारी कामगार नागरिकांना लघुशंका करावी लागत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तत्काळ शौचालय ची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.