शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis : ‘म्युकरमायकोसिस’वरील उपचारांच्या बळकटीकरणासाठी 'स्वाराती’रुग्णालयाला ८८ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:30 IST

एंडोस्कोपी युनिट, १९ सिरिंज इन्फ्युजन पंपा खरेदीसाठी होणार वापर

ठळक मुद्दे‘म्युकरमायकोसिस’वरील सर्जरीसाठी होणार मदत

अंबाजोगाई : पोस्ट कोविड उपचारांमध्ये म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास पालकमंत्री  धनंजय मुंडेंनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोर १९ सिरिंज इन्फ्युजन पंप खरेदी करण्यासाठी असे मिळून ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करताना आवश्यक एंडोस्कोपी सर्जरी करण्यासाठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट अत्यंत लाभदायक असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारात ४२,७८२ युएस डॉलर्स इतकी किंमत आहे. या युनिटसह ९.३६ लाख रुपये किंमतीचे १९ इन्फ्युजन पंप खरेदीसाठी एकूण ८८ लाख रुपये निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे  यांनी दिली आहे.अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ९० रुग्णांवर ११५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, बीड सह, नांदेड, उस्मानाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यातून देखील या आजाराचे रुग्ण येथे उपचार घ्यायला येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे स्वाराती हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सुधीर भिसे यांच्यासह या विभागातील सर्व निवासी डॉक्टरांच्या नेतृत्वात म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील या सर्वच टीमचे  धनंजय मुंडे यांनी स्वागत  केले आहे.

म्युकरमायकोसिसवरील उपचारांना मिळणार बळधनंजय मुंडे यांनी एंडोस्कोपी सायनो सर्जरी साठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट सारखे आधुनिक उपकरणे प्राप्त करून दिल्यामुळे म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारांना आणखी बळकटी व वेग येणार असल्याचे स्वाराती चे अधिष्ठाता डॉ.शिवाजी  सुक्रे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या