शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येत नसल्याने आईची आत्महत्या   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:59 IST

मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हतबल झालेल्या आईने नैराश्यातून गुरुवारी संध्याकाळी आत्महत्या केली.

पाटोदा (बीड) : मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हतबल झालेल्या आईने नैराश्यातून गुरुवारी संध्याकाळी आत्महत्या केली. ही दुखद घटना  तालुक्यातील वाघीरा येथे घडली असून आशाबाई पांडुरंग विघ्ने असे मृत आईचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वाघीरा येथे पांडुरंग विघ्ने हे कुटुंबासह राहतात. त्यांना वडिलोपार्जित तीन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. विघ्ने  आणि त्यांची पत्नी आशाबाई या एकमेव उत्पन्नाच्या साधनावर घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत. त्यांनी बँकेचे व काही प्रमाणात खाजगी कर्जसुद्धा घेतले आहे. 

विघ्ने यांना सुभाष, दैवशाला आणि रामदास अशी तिन मुलं आहेत. सुभाष याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले असून तो काम मिळवण्यासाठी पुण्याला राहतो, मुलगी दैवशाला अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहे तिची परीक्षा चालू आहे तर रामदास हा बेरोजगार आहे. यामुळे आशाबाई मुलांच्या शिक्षणाचा आणि घराचा खर्च कसा पेलवणार या विवंचनेत असायच्या. यातच सततच्या नापिकीने त्यांना खर्च भागवतांना मोठी कसरत करावी लागे. आधीचे कर्ज असल्याने त्यांना नव्याने कर्जसुद्धा मिळत नव्हते या नैराश्यातून त्यांनी गुरुवारी संध्याकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चांगदेव विघ्ने यांच्या माहितीवरून पाटोदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार ए.आर. पांडे अधिक तपास करत आहेत .

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याWomenमहिलाagricultureशेती