शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वानरांच्या सुडसत्राला लगाम ! नागपूर वन विभागाच्या पथकाने दोन तासातच पकडली दोन वानरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 10:39 IST

कुत्र्याने वानरांचे पिल्लू मारल्याने वानरांनी सुरू केलेल्या सूडचक्राला यामुळे अखेर लगाम बसल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव :  कुत्र्याच्या पिल्लाला उचलून घेऊन जात त्यांना उंचावून फेकून देत मारल्याच्या अनेक घटनांनंतर वानरे मुलांनाही उचलून घेऊन गेल्याचे प्रकार तालुक्यातील लवूळ येथे मागील दोन तीन महिन्यांपासून सुरू होते. या उपद्रवी दोन वानरांना नागपूरच्या वन विभागाच्या पथकाने आज सकाळी दोन तासातच पिंजऱ्यात जेरबंद केले. कुत्र्याने वानरांचे पिल्लू मारल्याने वानरांनी सुरू केलेल्या सूडचक्राला यामुळे अखेर लगाम बसल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत सुटकेचा निःश्वास सोडला.

लऊळ याठिकाणी मागील दोन ते तीन महिन्यापासून तीन वानरांनी धुमाकूळ घालत आणि श्वानांच्या पिल्लांना उचलून घेऊन जात त्यांना मारल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर हे वानर गावातील मुलांना देखील उचलल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे गावात दहशत पसरली होती. या घटनेचा लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता. यानंतर शुक्रवारी धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन नागपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते.

नागपूर येथील एक टीमने शनिवारी पहाटे येऊन वानरांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. या जाळीत दोन श्वानांचे पिल्ले ठेवल्यानंतर ते वानर जाळ्यात आले. या टीमने केवळ दोन तासात या वानरांना जाळ्यात घेतले. वानरांना पकडताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी नागपूरच्या टीमचे अभिनंदन केले.

कुत्र्यांनी मारले होते वानराचे पिल्लू       या वानरांच्या एका पिल्लाला लवुळ गावातील कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मारून टाकले होते. यामुळे रागाच्या भरात ही वानरे गावातील कुत्र्यांच्या पिलांना मारून टाकत आहेत, असे येथील ग्रामस्थ सांगतात. 

अनेक जण जखमीलवुळ गावातील सीताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिलाला १५ दिवसांपूर्वी वानर घेऊन गेले होते. नायबळ यांनी गच्चीवर जाऊन पिल्लाला सोडविण्याचा प्रयत्न केला असता वानर त्यांच्या अंगावर धावून आले. त्यात नायबळ गच्चीवरून खाली पडले आणि त्यांचा पाय मोडला. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

श्वानानंतर लहान मुले टार्गेट  गावातील कुत्र्यांच्या पिल्लांची संख्या कमी झाल्याने आता वानरांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवला. संतराम शिंदे यांच्या आठ वर्षांच्या नातवाला वानराने उचलून पत्र्यावर नेले होते. नागरिकांनी दगड व काठ्या उगारल्याने बालकास सोडून पळून गेले. ही वानरे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या पाठीमागे लागत, काही महिलांना त्याने मारल्याच्या घटनाही घडल्या.

टॅग्स :Monkeyमाकडdogकुत्राBeedबीडforestजंगल