शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सुडाने पेटली वानरे; महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांचा घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:43 IST

बीडच्या लवुळमधील घटना; माझे बाळ मारलेस, तुझ्याही बाळांना सोडणार नाही ! उंच झाडावर नेऊन खाली फेकून घेताहेत जीव.

पुरुषोत्तम करवा    माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील लवुळ येथे मागील एका महिन्यापासून वानरांनी धुमाकूळ घातला आहे. ही वानरे गावात कुत्र्याचे पिल्लू दिसले की त्यास उचलून घेऊन उंच  ठिकाणावरून त्या पिलांना ढकलून देत त्यांचा बळी घेत आहेत. या वानरांनी आतापर्यंत सुमारे २५० कुत्र्यांचा बळी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. याकडे मात्र वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.  

माजलगावपासून दहा किलोमीटर अंतरावर लवुळ हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या ठिकाणी मागील एक महिन्यापासून ही वानरे कुत्र्यांची पिल्ले उचलून घेऊन जात आहेत. कुत्र्यांच्या पिल्लांना उंच झाडावर किंवा घरावर नेऊन त्या ठिकाणांवरून फेकून देत आहेत. आतापर्यंत या वानरांनी सुमारे २५० पेक्षा जास्त कुत्र्यांचा पिल्लांचा बळी घेतला असल्याचे गावकरी सांगतात.       

याबाबत येथील ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते केवळ एक दिवस आले. थोडावेळ त्या वानरास पकडण्याचा प्रयत्न केला. पण वानर पकडता न आल्याने ते निघून गेले. त्यानंतर ते इकडे फिरकलेदेखील नाहीत.   

कुत्र्यांनी मारले होते वानराचे पिल्लू       या वानरांच्या एका पिल्लाला लवुळ गावातील कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मारून टाकले होते. यामुळे रागाच्या भरात ही वानरे गावातील कुत्र्यांच्या पिलांना मारून टाकत आहेत, असे येथील ग्रामस्थ सांगतात. 

अनेक जण जखमीलवुळ गावातील सीताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिलाला १५ दिवसांपूर्वी वानर घेऊन गेले होते. नायबळ यांनी गच्चीवर जाऊन पिल्लाला सोडविण्याचा प्रयत्न केला असता वानर त्यांच्या अंगावर धावून आले. त्यात नायबळ गच्चीवरून खाली पडले आणि त्यांचा पाय मोडला. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

आता लहान मुले टार्गेट  गावातील कुत्र्यांच्या पिल्लांची संख्या कमी झाल्याने आता वानरांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवला आहे. संतराम शिंदे यांच्या आठ वर्षांच्या नातवाला वानराने उचलून पत्र्यावर नेले होते. नागरिकांनी दगड व काठ्या उगारल्याने बालकास सोडून पळून गेले. ही वानरे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या पाठीमागे लागत असून काही महिलांना त्याने मारल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत, असे पंचायत समितीचे माजी सदस्य राधाकिसन सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडMonkeyमाकड