शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराने हडपली मयताची जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:41 IST

व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडेचार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे समोर आला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडेचार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे समोर आला आहे. याप्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून दिंद्रूड पोलीस ठाण्यात सावकार भावंडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समितीही नियूक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दरम्यान, यामध्ये आणखी लोकांची जमीन हडपल्याची शक्यता वर्तविली जात आहे.विलास व दत्तात्रय अंगदराव फपाळ (रा.बेलुरा ह.मु.शाहूनगर, माजलगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रामेश्वर गंगाराम उबाळे (रा.दिंद्रूड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मयत भाऊ शिवाजी यांना व्यसन होते. या व्यसनापायी त्यांनी काही कर्ज घेतले होते. २०१० साली त्यांनी आपल्या नावे असलेली जमीन विलास फपाळ यांच्याकडे तारण म्हणून ठेवली. २०१२ साली हा प्रकार त्यांनी कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी शिवाजी यांनी चक्रीवाढ व्याजासह १ लाख ८६ हजार रूपये कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर विलास यांनी ही जमीन परत करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही जमीन कोणालाही कल्पना न देता आपला भाऊ दत्तात्रय यांच्या नावावर केली. हा प्रकार समजल्यावर रामेश्वर यांनी दिंद्रूड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून विलास व दत्तात्रय यांच्याविरोधात ४२०, ४१७, ४१८, ५०६, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे.तपास सहा.पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके या करीत आहेत. सपोनि सचिन पुंडगे हे सहकार्य करीत आहेत.घाबरू नका, तक्रार देण्यास पुढे याया प्रकरणात आणखी काही लोकांची जमीन गहाणखत म्हणून ठेवून घेत ती आपल्या नावावर केल्याचे बोलल जात आहे. तसेच यातील आरोपींना राजकीय पाठबळ व गावात दहशत असल्यामुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे धजावत नाहीत.मात्र आता गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणून आपल्या तक्रारीवर ठाम राहण्यासंदर्भातही पोलिसांनी आवाहन केले आहे.त्रिसदस्यीय समिती नियुक्तकर्ज, जमीन व सावकारीची माहिती काढण्यासाठी आणि आणखी किती लोकांची जमीन हडपली, हे समोर आणण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. यामध्ये सहायक निबंधक, तहसीलदार एन.जी.झंपलवाड व दिंद्रूड ठाण्याचे सपोनि सचिन पुंडगे यांचा समावेश आहे. ही समिती पंचनामा व इतर माहिती जमा करून सहायक अधीक्षक नवटके यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी